* भाजयुमोच्या वतिने खा.शरदचंद्र पवार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध.
परळी वैजनाथ;-(प्रतिनिधी)आज रोजी जय श्रीराम या आशयाचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार त्यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा परळी च्या वतीने 2500 पत्र पोस्ट केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा श्री.शरदचंद्र पवार यांनी अयोध्येतील राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का? अश्या प्रकारच्या केलेल्या वक्तव्याने संबंध देशातील सर्व रामभक्त आणि हिंदुप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पुरोगामी विचाराचे शरदचंद्र पवार हे जाणीवपूर्वक हिंदुधर्माच्या भावना दुखावतात यामुळे दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होते यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र हे संबंध महाराष्ट्रातून दहा लाख जय श्रीराम या आशयाचे पत्र पाठवत आहेत.
मा.पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या आदेशाने व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात परळी येथून 2500 पत्र पाठवण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सतीश मुंडे,शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया,डॉ.शालिनी कराड,पवन मुंडे,पवन मोदानी,मोहन जोशी,नरेश पिंपळे,नितीन समशेट्टी,अनिष अग्रवाल,भाजपा युवा मोर्चाचे ऍड.अरुण पाठक, योगेश मेनकुदळे,योगेश पांडकर,गोविंद चौरे,वैजनाथ रेकने,धनंजय कुरील,निलेश जाधव,नितीन मुंडे, गणेश होळंबे,राम गित्ते,शाम गित्ते,चैतन्य मुंडे,पवन तोड़करी,श्रीपाद शिंदे,शिवाजी चाटे,उमेश निळे,जोगदंड आदी इतर कार्यकर्ते सोशल डिस्टन्स पाळत या आंदोलनात सहभागी झाले.
No comments:
Post a Comment