Monday, July 20, 2020

परळीत कोरोना प्रभावित काही भाग वगळता शहराची संचारबंदी शिथिल.

परळी वैजनाथ ; (प्रतिनिधी)परळी शहरात विविध भागात कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आल्यामुळे संपूर्ण शहरात कंटेनमेंट झोन घोषित करून संचारबंदी लागू करण्यात आली होती परळी शहरांमध्ये दिनांक 4 जुलै ते 20 जुलै या कालावधीत संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती परळी शहरात काही ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत शहरातील या ठिकाणी संचारबंदी कायम ठेवून शहरातील इतर भागात असलेली संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे
परळी शहरात सर्वेश्वर नगर विद्यानगर मोंढा गांधी मार्केट सिद्धार्थ नगर आझाद नगर इंदिरा नगर भीम नगर न्यू पेठ मोहल्ला,गोपनपाळे गल्ली जुने रेल्वे स्टेशन गुरुकृपा नगर बरकत नगर याठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करून याठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे मात्र परळी शहरातील इतर ठिकाणची संचारबंदी शिथील करण्यात आल्याचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत                           

No comments:

Post a Comment