नेकनूर (प्रतिनीधी )- बीड शहरासह ग्रामीण भागात चोरटे चालत्या गाडीवरून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवत आहेत. अशीच घटना मोरगाव येथील जाधव वस्ती येथे घडली होती. घरासमोर बसलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडून चोरटे फरार झाले होते. नेकनूर पोलिसांनी दोन चोरट्यांना तात्काळ जेरबंद केले होते. शाहुबाई बांगर (रा. जाधव वस्ती) ही महिला आपल्या दारासमोर बसली होती. या वेळी दोघे जण मोटारसायकलवर आले. या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र पळवले. या प्रकरणी नेकनूर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ या चोरट्यांचाशोध घेतला असता या दोघांना मांजरसुंबा येथे जेरबंद करण्यात आले. यामध्ये अजय नितीन धुताडमल (रा. माळापुरी), संदीप नाना तुपे (रा. पिठ्ठी नायगाव ) या दोन चोरट्यांचा समावेश आहे. या चोरट्यांकडून मोटारसायकल क्र. २३. जे.झेड. ६००० ही गाडी जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय विलास जाधव हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment