Monday, July 20, 2020

ठाकरे सरकार मधील मुंबईचे पालकमंञी कॕबिनेट मंत्री ना.अस्लम शेख यांना कोरोनाची लागण.

मुंबई – राज्यातील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण झाली असून मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे.अस्लम शेख यांनी ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून स्वत:ला विलग (आयसोलेट) करुन घेत आहे. माझ्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी” अशी विनंतीही अस्लम शेख यांनी केली आहे.
दरम्यान कोरोना काळात अस्लम शेख यांनी मुंबईतील अनेक कोरोना हॉटस्पॉट भागात पाहणी दौरे केले आहेत या दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. अस्लम शेख हे मुंबईतील मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सध्या ते ठाकरे सरकारमध्ये वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव आणखी वाढत असल्याचं दिसत आहे.

No comments:

Post a Comment