Monday, July 20, 2020

वाळु घेऊन जाणाऱ्या छोटाहात्ती टमटमच्या धडकेत खारी विक्रेत्याचा मृत्यू

.
माजलगाव;-(प्रतिनीधी ) वाळू घेवून जाणार्‍या टमटमने खारि विक्रेत्यास जोराची धडक दिल्याने या अपघातात सदरिल विक्रेता जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना आज पहाटे ५.३० वाजण्याच्या दरम्यान पात्रुडपासून जवळच असलेल्या खामगाव पंढरपूर हायवे रस्त्यावर घडली. दरम्यान माजलगाव तालुक्यात वाळू माफियांनी उच्चांद मांडला असून रात्री अपरात्री वाळूच्या गाड्या भरधाव वेगाने धावत आहेत. वाळू माफियावर कठोर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली जात असली तरी वाळू माफियावर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.
शेख अन्वर हे खारि विक्रीचा व्यवसाय करतात. आज पहाटे ५.३० वाजेच्या दरम्यान हे शिंदेवाडी फाट्यावर मोटारसायकल बाजूला उभी करून खारि विकत होते. याचवेळी वाळू घेवून निघालेल्या टमटमने त्यांना जोराची धडक दिली. यात ते गंभीररित्या जखमी होवून जागीच ठार झाले. या घटनेची माहिती पात्रुडचे सरपंच कलीम मनसबदार, शेख युसूफ, जमादार खराडे यांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने पात्रुड येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान तालुक्यात वाळु माफियांनी उच्छांद मांडलेला आहे. वाळूमाफियामुळेच आज खारि विक्रेत्याचा जिव गेला आहे. वाळूमाफियाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

No comments:

Post a Comment