Thursday, July 23, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी बोलावली बैठक.

बीड (प्रतिनीधी )ः- बकरी ईद निमित्ताने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आज बैठकीचे आयोजन केले होते. कोरोनाच्या कार्यकाळात सर्वांनी घरामध्येच राहून ईद साजरी करण्याच्या सुचना प्रशासनाच्यावतीने देण्यात आले. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधिक्षकांसह शहरातील मुस्लीम धर्म गुरूंची उपस्थिती होती.
सध्या देशात कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे नियमाचे पालन करण्याच्या सुचना शासनाच्या आहे. सन,उत्सव आपआपल्या घरामध्ये साजरे केले जात आहे. १ ऑगस्ट ला बकरी ईद आहे. या निमित्ताने मुस्लीम बांधवांनी घरामध्येच ईदची नमाज अदा करावी असे राज्य शासनाचे निर्देश आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी शहरातील मुस्लीम धर्म गुरूंची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्यासह अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment