Saturday, July 18, 2020

लॉकडाऊनमुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ! एस टी महामंडळाचा मोठा निर्णय.

मुंबई .(प्रतिनीधी):  महाराष्ट्रावर आलेल्या कोरोना महामारीमुळे लालपरी समजली जाणारी एसटी बसला ब्रेक लागला आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. सततच्या लॉक डाऊनमुळे  10 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केली आहे. महामंडळानं घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे .  एसटी महामंडळानं याबाबत एक पत्रक जारी केलं आहे. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचं पत्रक विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आलं आहे. 2019 च्या भरती मधली ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे एसटी बंद असल्याने उत्पन्न ठप्प झालं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
सरळसेवा 2019 मध्ये भरती झालेले चालक-वाहक यांची सेवा तात्पुरती खंडित करावी, भविष्यात गरज असेल तर ज्येष्ठते नुसार पुन्हा सेवेत घ्यावे, चालक-वाहक, सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, अन्य अधिकारी किंवा अनुकंपा तत्वावरील जे उमेदवार प्रशिक्षण घेत असतील, त्याचे प्रशिक्षण थांबवावे, कोरोना संकट टळल्या नंतर पुढील परिस्थिती पाहून या कर्मचाऱ्यांना पुन्हा ज्येष्ठते नुसार सेवेत घेतलं जाईल, असही पत्रकात म्हटलं आहे.    जवळपास 8500 वाहक, चालकांसह इतर कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांच प्रशिक्षण सुरु आहे, अशांना थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रत्येकाची आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा परिस्थितीत कोणाला नोकरीवरुन काढू नका, असं आवाहन सरकारनं केलं आहे. मात्र, सरकारच्या ताब्यात असलेल्या एसटी महामंडळानं सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित केली आहे.

No comments:

Post a Comment