Saturday, July 18, 2020

लाडेवडगाव शिवारात युवकाचा खूनयुसुफवडगावचे पोलीस घटनास्थळी दाखल.

केज (प्रतिनीधी ):- लाडेगाव शिवारामध्ये एका ३९ वर्षीय युवकाचा खून करून मृतदेह एका शेतामध्ये टाकून देण्यात आला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याची माहिती युसुफवडगाव पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छदनासाठी रूग्णालयात आणला होता. या घटनेने लाडेगाव शिवारात एकच खळबळ उडाली. सदरील हा प्रकार कुठल्या कारणावरून घडला याचा तपास युसुफवडगावचे पोलीस करत आहेत. 
    युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लाडेगाव शिवारात बाबासाहेब चंद्रभान लाड (वय ३९) या तरूणाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती सकाळी परिसरातील लोकांना झाल्यानंतर याबाबत युसुफवडगाव पोलिसांना कळवण्यात आले. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या युवकाचा खून करून मृतदेह शेतामध्ये टाकण्यात आला. सदरील मयत युवक हा अर्धनग्न स्वरूपात आढळून आला. पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात आणलेला होता. त्या युवकाचा खून कोणी आणि कुठल्या कारणासाठी केला असावा याबाबतचा सखोल तपास युसुफवडगावचे पोलीस करत आहेत. या घटनेचे लाडेगाव शिवारात एकच खळबळ उडाली.

No comments:

Post a Comment