प्रस्तावना;- पंधराव्या व सोळा-व्या शतकात जेव्हा युरोपमध्ये साथीचा रोग आला तेव्हा युरोप च्या लोकांकडे ना गटारी होत्या,ना रस्ते होते ना त्यांच्याकडे आरोग्याच्या सुविधा होत्या ते घाणेरडे म्हणण्यासारखे राहायचे . तेव्हा युरोपियन लोकांमध्ये प्लेग आला आणि हजारो लोक मेले पण त्यामुळे सर्व युरोप मध्ये एक नवा दृष्टीकोन निर्माण झाला. नवी शिष्टाचार पद्धती निर्माण झाली .
उदाहरणार्थ हात धुणे, प्लेट धुणे, चमच्याने खाने , शिंकले की सॉरी म्हणणे. नाका-तोंडावर रुमाल धरणे ही युरोपियन लोकांची प्लेग ची आठवण आहे.
युरोपमध्ये प्लेग ला रिस्पॉन्स म्हणून काय केले ? त्यांनी स्वतःचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवला ,स्वतःला रॅशनल बनविले कारण, त्या प्लेगने त्या क्षणाला त्यांच्या लक्षात आणून दिले होते ,की आपण हजारो वर्ष चुकीचे मूल्य, चुकीचे दृष्टीकोन चुकीच्या धारणा घेऊन जगत आलो आहोत आणि त्यांची मनुष्य म्हणून भयंकर किंमत मोजली आहे. हे त्यांच्या समाज म्हणून लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वतःची मानसिकता बदलली ,शहराची रचना बदलली ,प्रशासनात कमालीची शिस्त आणली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले विज्ञान पक्के करून घेतले." एखादा रोग मनुष्याचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करतो आणि त्यानंतर व्यक्ती स्वतःच्या वाईट वर्तनाची जाणीव करून घेऊन त्यात बदल घडवून आणतो तसाच हा काळ कोरोणाचा झाला आहे...
करोना काळा मध्ये व्यक्तीला वाईट कृत्याची जाणीव होण्यापेक्षा त्याला वाईट कृत्य करावयास लावणारे प्रसंग अधिक समोर आले .अशीच एक घटना लॉकडाऊन च्या काळात घडलेली आपला समवेत मांडण्यात येत आहे .यावरून आपल्या लक्षात येईल, की एक मनुष्य हा किती खालच्या स्तरावर उतरून त्याचं वर्तन करू शकतो.
दिनांक 23 मार्च 2020 ला महाराष्ट्रा मध्ये संचार बंदी लागू करण्यात आली आणि सर्वत्र बंद हे कटाक्षाने पाळल्या जाऊ लागले. तेव्हा श्रीमती शारदा (नाव बदलेले आहे) व तिचे पती तिचे बाळ व सासू चे चौघेजण उच्चभ्रू सोसायटी मध्ये राहत होत..
करोना काळात तेव्हा काम ठप्प पडलेले होते, सर्वत्र करोणाचा विषारी कहर सुरू होता, टेलिव्हिजनवर तासा तासात करोना अपडेट आणि मनाची होणारी घालमेल सुरू झाली होती.शारदा उच्च शिक्षित वर्किंग वुमन होती सर्वांची काळजी घेणे हा आपला सर्वप्रथम धर्म, जबाबदारी कर्तव्य म्हटल्या प्रमाणे तिने स्वीकारले होते आणि त्यानुसार सुशिक्षित वर्तन ही तिचे होते. तसेच प्रखड वक्ती आणि सहन करणे हा तिचा पिंड नसल्या प्रमाणे चुकी झाल्यास चूक दाखविण्याचा स्वभावही शारदाचा होता. तसेच ति कठोर स्वाभाविक पण तिच्या कठोरतेत सार्वजनिक हित ही नेहमी लपलेले असे.
तेव्हा दिनांक 25 मार्च पासून आपल्या सोसायटीच्या वरिष्ठ व कनिष्ठ सर्व मंडळींनी आपला फावला वेळ कसा घालवायचा याविषयी विचार विनिमय करणे सुरु केले 26 मार्च 2020 पासून सोसायटी मध्ये सुकलेले वाळून गेलेल्या गार्डनला त्यांनी क्रिकेटचे ग्राउंड करून टाकले. क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली '
सर्व क्रिकेट प्रेमी व शारदास ही क्रिकेटचा खूप छंद आसा होता तिचे धर्म-पती तर क्रिकेटचा कॅप्टन म्हणून प्रसिद्ध होते.तेव्हा लोकांनी सुरू केलेला हा खेळ सतत सायंकाळी चार ते सहा च्या दरम्यान सुरू झाला.दि. 28 मार्च 2020 रोजी शारदाचे पतीही क्रिकेट खेळण्यास खाली उतरले तेव्हा दोन ते तीन वेगवेगळ्या असणाऱ्या विंगमध्ये जसे आयपीएल सुरू झाले असे खेळ सुरू झाले परंतु दिनांक 29 मार्च 2020 रोजी शारदाच्या बाळास ताप चढला व सकाळीच औषध उपचारासाठी अशासकीय रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा शारदाची अवस्था खूपच व्याकूळ असलेल्या आईची होती आणि मनात या करोंनाची भीती तेव्हा ती सतत विचार करू लागली की,आपल्या बाळाला हा ताप कसा आला ?आलेला हा ताप करोंनाचा तर नसावा ? सर्व सुरक्षा घेऊनही बाहेर न पडता आपल्या बाळास ताप जडला कसा? असा प्रश्न ती स्वतःला विचारू लागली तेव्हा तिला क्रिकेटच्या खेळाचा वेळ व दवाखान्यातून घरी आणलेले बाळ त्यात आपले पती नेहमीप्रमाणे खेळण्यास जाताना समोर आले व तेव्हा तीने आपल्या मनाचा ठाब असा निर्णय करून घेतला की पती क्रिकेट खेळल्याने आपल्या बाळाला संसर्ग झाला असावा.
तेव्हा तिने आपल्या पतीला विनंती करून त्याला खेळण्यास विरोध केला त्याचबरोबर खेळाचा मुख्य व सोसायटीच्या वरिष्टणाही विनंती केली की आपण असे खेळ खेळू नये की, ज्याने शासकीय नियमांचे उल्लंघन होईल .विनंतीला मान देऊन मोजके दोन दिवस संचार बंदी च्या काळात क्रिकेट खेळ बंद झाला व पुन्ह दि.03.04.2020 पासून शारदाच्या विरोधाभासाने या खेळाची नव्याने सुरुवात करण्यात आली. लोकांनी ठाम मत करून घेतले की , आपल्याला काय करोना झालेला आहे म्हणून आपण खेळायचे नाही आणि आपल्याला आपली काळजी घेता येते म्हणून इतरांच्या ऐकायचे नाही . ही बाई आपल्यास पुन्हा विरोध करू नये या मनोवृत्तीने समोर अनेक प्रसंग घडत
एका विषाणूला घाबरलेल्या आईने केलेल्या विनंतीला मान फक्त दोन दिवसाचाच आपल्या देशात दिला गेला व शासनाचा विरोध ही झाला ,त्याचबरोबर मी किती हुशार, शहाणा आहे व विरोध करणारा किती कमी हे दाखविण्यासाठी हा एक मतलबी वर्ग कोणत्या थरापर्यंत पोहोचू शकतो याची प्रचीती या काळात समोर आली पुढे....
दिनांक 3 एप्रिल 2020 रोजी पासूनच क्रिकेट हे शारदाच्या विरोधात सुरू झालेल होत तिला ठासून व तिच्या नाकावर टिच्चून खेळायचं म्हणून खेळल्या जात होते .हे तिला जाणवत होते .तसेच त्ज्याच्या घरातून क्रिकेट खेळण्यासाठी येणारी पुरुष होते त्या पुरुषाच्या अर्धांगिनी त्यांना रोखत नसतील का ? तरीही हे महाभाग ऐकत नसतील असा समज करून घेतला होता . तसेच तरुण व वरिष्ठ मंडळी सोसायटीच्या गार्डनमध्ये एक क्रिकेटचा खेळ खेळत होते तेव्हा दहा ते पंधरा वर्षे वय असलेले बालक आपल्या घराच्या बाल्कनीतून त्यांना बघत होती ,हि त्या बालकास बघत होती. बरेच लहान मुलं हट्ट करताना ही तिला दिसत होत व आपल्या आपल्या ताब्यातून बाहेर पडलेल्या बाळाचं ही समजूत होती की बाळा बाहेर जाऊ नये बाहेर करून आहे तो वाईट आहे हे सतत मी महिनाभर सुरू राहील त्यात तिचं वर फ्रॉम ही सुरू होताच .
त्यात एक नवं वळण समोर आला की, दि. 15 मे 2020 रोजी पोलिसांची गाडी त्यांच्या सोसायटीमध्ये फेरफटका मारण्यास येऊन गेली आणि त्या क्रिकेट टीमला चाप देऊन गेली ,तेव्हा पुन्हा सहन न करणारी शारदाने आपल्या भावनांना आवर न घालता पुन्हा त्या टीमला विनंती केली की, सर आता तरी बंद करा. जिच्या विरोधात आपण खेळत होतो पुन्हा तीच बंद करा म्हणते. तिच्यासमोर आमच्या टीमचा झालेला अपमान कसा सहन करावा. तेव्हा हे असहाय झालेल्या टीमने तिला प्रतिउत्तर दिलं काय त्रास होतो तुम्हाला? असे प्रश्न केले आणि त्रास होत असल्यास सोसायटीला अर्ज करा . असा तिला समज सांगितला या करोना च्या काळात व्यक्ती अगोदरच स्वतःच्या मानसिकतिची घालमेल घालत उभा राहण्याचा प्रयत्न करत होता, हा पुन्हा मानसिकतेचा विस्कविटण्याचा प्रयत्न कुठेतरी ज्या देशात धरणी मातेला आई म्हटलं जातं व लेडीज फर्स्ट म्हटल्या जातं त्या देशात सुरू होता. एक उच्चशिक्षित महिलेशी जेव्हा इतर शिक्षित व्यक्तीशी कसे वागायला हवे हे जर कळत नसेल तर त्या शिक्षितांना शिक्षित म्हणावं का? नाही तर अशिक्षित निरीक्षर असलेला माणूस सुद्धा बाई माणसाचा कसं बोलावं व कसे बोलू नये याचं भान मनात ठेवून वागतो. तेव्हा या उच्चशिक्षित सोसायटीच्या उच्चशिक्षित लोकांनी त्यांच्या उच्चशिक्षित भगिनीस असे आरोप केले..
त्रास होतो व त्त्याचा उपाय आपल्यासमोर मिळेल म्हणून शारदाने स्पष्ट आणि सकारात्मक मनाने तक्रारी अर्ज सादर केला. अशा भाषेत कारण अर्ज करावा लावण्याचा तिलाही राग आलेला होता. क्रिकेट बंद होण्याची अपेक्षा मनात बाळगून तिने हा अर्ज केलेला परंतु एका स्त्री कडून इतक्या लोकांच्या विरोधात अर्ज येतो ही गोष्ट त्या टीमला पचली गेली नाही , सहन झाली नाही आणि पुन्हा या पितृसत्ताक पद्धतीमध्ये महिलेचा विरोध करण्यासाठी महिलांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला. शारदाच्या अर्जाच्या विरोधात क्रिकेट खेळणाऱ्या लोकांनी आपल्या बायकांना अर्ज करायला लावला. तिच्या विरोधात बायकांनी अर्ज केला की, तिने आमच्या नवर्यांना अपशब्द वापरले. हे पुरुष माझ्याकडे पाहतात म्हणून असा विरुद्ध अर्ज केला. एकीकडे करोना संचार बंदीमुळे कामे ठप्प , कोर्ट कोर्ट ही बंद आणि या शारदाच्या सोसायटीमध्ये अर्जावर अर्ज ,
तक्रारीवर तक्रारी , विरोधावर विरोध सुरू होता.... का ..? कशासाठी? फक्त एक महिला आणि ती असंख्य असलेल्या क्रिकेट टीमच्या पुरुषांचा विरोध करत होती. म्हणतात ना "स्त्री हिच स्त्रीची दुश्मन असते" असा अनुभव शारदाने घेतला. पावसाने झोडपलं आणि नवऱ्यानं मारलं याच दुख न मानणार्या, चुकी असलेल्या नवर्यांच्या बायका त्या शारदास भांडण्यासाठी तयार होऊन उभ्या राहिल्या. प्रथमदा शारदेला त्यांची दया आली कारण त्यांची इच्छा असताना सुद्धा त्या विरोध करू शकत नव्हत्या त्यांना त्रास होत असताना सुद्धा त्या नवऱ्याचा विरोधात जाऊ शकत नव्हत्या . हा आपला समाज नवऱ्याने केलेली चूक शिरो हरी घेऊन त्याच्या वाईट कर्मात सुद्धा तिने त्याची साथ द्यावी असा आहे
अशी करोना काळामध्ये समाजातील उच्चशिक्षित त्यांचं वर्तन एका शारदेला त्रास देऊ शकते तेव्हा तिच्यासारखे कितीतरी शारदाया प्रत्येक घरात आहेत. कोणा कोणाशी लढणार ती ,खरंच होईल का या समाजात स्त्री सन्मान , अरे स्त्रीच्या अस्तित्वाला व सत्याला मिळेल का? न्याय या उच्चशिक्षितानी लगेच तिला गालबोट लावण्याची सुरुवात केली त्यावेळी एक पुरुषच धावून आला. तो म्हणजे तिचा पती. जो ते सगळं बघत होता. त्यात प्रखडपणे त्याला जाणवत होते की , यात चुकीचं काही नाही. एका बाजूला अनेक चुका करणाऱ्या पुरुषांच्या बायका त्यांच्या साथीला होत्या तर दुसर्या बाजूला अनेक चुका करणाऱ्या पुरुषांच्या विरोधात लढणारी एक महिला तिच्या पाठीशी तिचा पती होता . त्यामुळे शारदाला तिचं पावित्र्य जपता आले आणि तिच्या पावित्र्याला जपण्यास तिच्या पतीने सहकार्य केलं . कोरोंनाच्या काळात कोरोंनाची भीती व स्वतःची नेहमीची जीवनपद्धती त्यातील होणारा बदल संचारबंदी, लॉक डाऊन मध्ये क्रिकेट खेळण्यास विरोध करणाऱ्या शारदेला अशा स्वरूपात वागणूक दिल्यानंतर कोणत्या सामाजिक आणि मानसिक तिची सुरक्षिततेविषयी आपण विचार करावा असाही प्रश्न समोर येतो.
करोंना च्या काळामध्ये अनेक वेबिनार झालीत त्यामधला महत्त्वाचा मानसिक आणि सामाजिक क्षमतेविषयी विचार करणारा वेबिनार या वेबिनार मध्ये सामाजिक आर्थिक व मानसिक बाजूवर बोलताना डॉक्टर अरविंद राज म्हणाले की" करोणा याआजाराने लोकांची मानसिक स्थिती पूर्णतः ढासळली आहे. भारतात covid-19 विषाणूने बाधित मृत्यूचा दर कमी आहे. परंतु या काळात आलेली बेरोजगारी व त्यामुळे झालेल्या आत्महत्या आणि अपघातात मृत्यू होण्याची संख्या अधिक आहे अशा परिस्थितीत समुपदेशकाची भूमिका महत्त्वाची ठरत असून आपण समाजात? सकारात्मकता पसरविणे गरजेचे आहे." या डॉक्टर अरविंद राज यांच्या मताला आपण सहमत असलो तरी आपल्या देशातील विरोध करण्याची वृत्ती ही लोकांच्या नकारात्मक मानसिकता बदलून सकारात्मक मानसिकतेत बदल होऊ देणार नाही. त्याचं साक्षात उदाहरण म्हणजे शारदचा लोक डाऊन चा अनुभव त्या स्त्रीने सर्वांच्या सुरक्षितेसाठीचा संचार बंदी च्या काळामध्ये खेळायला जाणाऱ्या सामूहिक क्रिकेट टीमचा विरोध करून स्वतःच्या अंगावरचे आरोप सहन केले. असा आरोप करणाऱ्यांची मानसिकता बदलणे अवघडच आहे. ही घटना उच्चशिक्षितामध्ये घडल्यास त्अशी परिस्थिती दिसते , तेव्हा 75 टक्के ग्रामीण भागांमध्ये करोनाचा प्रसार झाला तेव्हा त्यांच्या नकारात्मक मानसिक तिला आळा घालणे अवघड होईल.
जोपर्यंत भारतीय नागरिकास स्वतःहास वाटत नाही की, आपल्याला नियम घालून घेतले पाहिजेत, आपल्या जीवाची काळजी आपण स्वतः घ्यावी व सकारात्मक बाजूने सर्व गोष्टी कडे बघावे तोपर्यंत युरोप सारखे परिवर्तन या देशात होणे जरा अवघडच आहे. तेव्हा नवा दृष्टिकोन व नव्या शिष्टाचारचे स्वागत करावयास हवे, चुकीचा दृष्टीकोन बदलण्यास हवा. स्वतःची मानसिकता बदला आणि तार्किक सत्यस महत्त्व द्यावे. याकाळामध्ये क्षणिक सुखाचा मोह दूर करण्यात हवा. मान्य आहे की, " प्रवाहाच्या विरोधात वाहणारे ही असतात पण सगळेच दगड हे मोती होत नाहीत आणि सगळेच मोती चमकत ही नसतात.
*समाजशास्त्र विभाग*
*डाॕ.आरती मिलिंद धनवे.
(एम.ए.एम.फिल.नेट.पी.एच.डी.)
*डाॕ.सौ.इंद्राबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालय औरंगाबाद .
लज्जास्पद..
ReplyDeleteपण वास्तविकता