केज ;- (प्रतिनीधी ) शेगाव-पंढरपूर राज्य रत्याचे काम पुर्णपणे संपत आले तरीही गुत्तेदार व कंपनीच्या अधिकार्यांनी डिवायडर किवा सिग्नल बसविले नसल्यामुळे दररोज अपघात घडू लागले आहेत. याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याने वाहन धारकात संताप व्यक्त केला जात आहे. रात्रीच एक अपघात घडला असून यात तिघे जण जखमी झाले आहेत.
काल रात्री नऊच्या दम्यान धारूरहुन भरधाव येणारी व्हिस्टा कार भवानी चौकातील कठड्याला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की मोठ्या प्रमाणावर आवाज झाल्याने घटनास्थळी धाव घेतली होती. यात गाडीतील तिघे जण गंभीररित्या जखमी झाले. जखमींना उपचारार्थ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. केज-धारूर रोडवर स्पीडब्रेकर किंवा सिग्नल बसवण्यात आले नसल्याने सातत्याने अपघात घडत आहेत. केज - धारुर राज्य रस्त्यावर गुत्तेदाराने व संबंधित अधिकार्यांनी पाहणी करुन तात्काळ सिग्नल बसवावे आन्यथा केज विकास संघर्ष समीतीच्या वतिने अंदोलन छेडण्याचा ईशारा समीतीच्या वतिने देण्यात आला.
No comments:
Post a Comment