नवी मुंबई – आपल्या पॉलिसीमुळे चर्चेत आलेला व्हाॅट्सअ‍ॅप (WhatsApp) लवकरच आपल्या यूजर्ससाठी नवीन फीचर्स आणणार आहे. जगात सर्वात जास्त वापरला जाणारा व्हाॅट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अनेक यूजर्स आपल्या खासगी कामासाठी , ऑफिसच्या कामासाठी तर काहीजण व्यवसायासाठी  व्हाॅट्सअ‍ॅपचा वापर करतात .(WhatsApp will soon bring a new feature, which will include ‘this’ emojis)

सध्या व्हाॅट्सअ‍ॅपवर इमोजी वापर जास्त प्रमाणात वाढला आहे. व्हाॅट्सअ‍ॅपने लेटेस्ट इमोजी पॅकचा समावेश करण्यास सुरूवात केली असून अॅड्राईड फोनच्या बिटा बिल्डमध्ये या नव्या इमोजींचा समावेश करण्यात येत आहे. त्यामुळे आता युझर्सची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे दिसतंय.

नव्या इमोजी पॅकमध्ये फायर हार्ट, दाढी असलेले चेहरे त्यासोबतच अनेक किंसिंग असलेल्या चेहऱ्याच्या इमोजींचा समावेश करण्यात आला आहे. अॅड्राईडसोबतच अॅपलच्या देखील इमोजी पॅकमध्ये या फिचरचा समावेश असेल. येणारे होणारे इमोजी पॅक वैशिष्टपुर्ण असल्यानं चाहत्यामध्ये या इमोजी पॅकची उत्सुकता लागली आहे.