Tuesday, August 17, 2021

जनआर्शिवादयात्रेत भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पंकजाताई मुंडे कार्यकर्त्यांनवर रागावल्या.








बीड  (प्रतिनीधी)  भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे या आपल्या कार्यकर्त्यांवर भडकल्या आहेत. पंकजा मुंडे जनआशीर्वाद यात्रेसाठी उपस्थित होत्या, त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, यातील काही घोषणा ऐकून पंकजा मुंडे खूप रागावल्या. पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है, या घोषणेवर पंकजा मुंडे यांनी थेट बाहेर येऊन कार्यकर्त्यांना इशारा दिला.

अशा अंगार भंगार सारख्या गलिच्छ घोषणा कुणी देत असेल, तर मी त्याला आयुष्यात भेटणार नाही, मुर्ख कुठले, तुमच्या अशा वागण्याने त्रास होतो, अशांना मी कधीच भेटणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

तसेच गोपीनाथ मुंडे अमर रहे, या घोषणा तुम्ही देऊ शकतात, कारण तुमचे गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम आहे, त्यात मला काय कुणालाच आड येता येणार नाही, पण अंगार भंगार सारख्या घोषणा देऊ नका, अशा लोकांना मी आयुष्यात भेटणार नाही.आशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना  खडसावले.

No comments:

Post a Comment