Sunday, August 1, 2021

अण्णाभाऊ साठे यांना बीड समता सैनिक दलाची मानवंदना .101 व्या जयंतीनिमित्त देशात प्रथमच समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली - अमरसिंह ढाका


बीड( प्रतिनिधी) दि. 1 "जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भिमराव"
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 वी जयंती बीड शहरात समता सैनिक दल व भारतीय बौध्द महासभा बीड यांच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचा मुख्य कार्यालया पासून समता सैनिकांची रॅली काढून साजरी करण्यात आली. या मध्ये प्रथमच समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा बीड यांच्या वतीने साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळात खूप महार मांग ऐक्य परिषदा लावल्या. नुसत्या मांग समाजाच्या पण 11परिषदा घेतल्या. त्या एवढ्या वर न थांबता त्यांच्या भाषणा मध्ये म्हणायचे मला जर एखादी मुलगी असती तर मी माझ्या मांग समाजातील कुटुंबात दिली असती. म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महार आणि मांग समाजात ऐक्य निर्माण व्हावे म्हणून त्यांच्या हयातीत प्रयत्न शील होते. आणि समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मातृ संस्था आहे व ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न भारत बौद्धमय करण्याचे काम करीत आहे व अण्णाभाऊ साठे हे सुद्धा सांगतात की जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भिमराव... या संदेशा नुसार खूप आमची मातंग बंधू धम्माच्या वाटेवर काम होते करत आहेत त्या मध्ये स्मृतिशेश आत्माराम चांदणे साहेब, सत्यशोधक समाज महासंघाचे स्मृतीशेश जी. एस. दादा कांबळे, धर्मराज मुजमुळे, यांनी बीड मध्ये धर्मांतर चळवळीला धर्मांतर करून चालना दिलेल्या आहेत म्हणून आम्ही समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा बीड यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महार मांग ऐक्य घडवून आणून मांग बांधवांना धम्मात सामील करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला जय भीम व सर्व समाजाला जयंती निमित्त  हार्दिक शुभेच्छा....जागतिक मैत्री दिनी दोन्ही समाजात व सर्व समाजात मंगल मैत्री व्हावी हीच सदिच्छा अमरसिंग ढाका समता सैनिक दलाच्यावतीने भावना व्यक्त केली आहे. यावेळी बीड शहरातील समता सैनिक व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी त्यामध्ये अध्यक्ष विष्णु कांबळे, गौतम खेमाडे, सोनवणे, अनिल डोळस, पटेकर, कांबळे व राजाभाऊ आठवले, यशवंत कदम, अजय गालफाडे, सिद्धार्थ जगझप, राजेंद्र दाभाडे, अंकुश कोरडे, किशोर वाघमारे, दत्ता सौदर्मल, मिठू वाघमारे, अपेक्षा घोडके, सौरभ वाघमारे,सचिन जोगदंड, प्रणित वाघमारे, प्रेम जावळे, योगेश शिंदे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment