Wednesday, August 11, 2021

तहसिलदार यांच्या मनमाई कारभारामुळे श्रावण बाळ / संजय गांधी निराधार लाभार्थ्याची उपास मारीची वेळ.

 

 



बीड : (प्रतिनीधी) गेवराई तहसिल कार्यालया समोर श्रावण बाळ / संजय गांधी या योजनेतील प्रलंबित प्रश्नांसाठी गेवराई तहसील कार्यालया समोर छावा क्रांतिवीर सेना संघटनाचे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आसून तहसिल कार्यालयातील संबंधीत पेशकार 

श्रीनिवास मुळे हे रजा टाकून गेल्या ने श्रावण बाळ / संजय गांधी / या योजनेतील तुर्टी काढून त्यांचे मानधन तहसिल लाच धूळ खात पडले ले आहे पेशकार श्रीनिवास मूळे यांनी फाईल वरती सही नाही केलेली म्हणून कारण दाखवत तु र्टी चे दोन कांही लाभार्थ्यांचे दोन वर्षाचे म्हणजे मागील लॉक डाऊन मधील पंतप्रधान यांनी दिलेले व चालू लॉक डॉऊनचे आले ले दर मंथली मानधनाचे तुर्टी करून ऑफीस लाच धुळखात मानधन पडलेले आहे .

त्याच प्रमाणे संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजनेतील हजारो प्रकरणाच्या फाईली गेवराई तहसील कार्यालयात २०१८ पासुन धूळ खात पडून आहेत .त्यामुळे हा निराधारांचा महत्त्वाचा मुद्दा छावा क्रांतिवीर सेना या संघटनेच्या माध्यमातून आज आमरण उपोषण गेवराई तहसील कार्यालय समोर सुरू आहे. 

गेवराई तालुक्यातील अनेक निराधारांच्या फाईली प्रलंबीत आहेत .संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या फाईली २०१८ पासून धूळ खात पडून असल्याने या निराधारांचा प्रकरणे निकाली काढण्यासाठी छावा क्रांतीवीर सेना या संघटनेच्या माध्यमातून दि ३/०८/ २०२१ निवेदन गेवराई तहसीलदार यांना देण्यात आले होते. 

 मात्र या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज दि ११ रोजी जोपर्यंत या प्रलंबित प्रकरणे निकाली काडत नाहीत तोपर्यंत छावा क्रांतीवीर सेना संघटनाच्या माध्यमातून उपोषण सुरूच राहणार असे संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष राहुल चाळक यांनी म्हटले आहे यावेळी उपोषणाला उपस्थित मुक्तराम मोटे,अविनाश तांदळे, कृष्णा जोगदंड, आकाश गोरे,ऋषिकेश परदेशी ,सुदाम मोरे ,पवन बण,संदीपान कचरे, संचार उमाप, अनिल राठोड, वक्ते विशाल,शाम अडागळे व नागरिक होते.

No comments:

Post a Comment