*मृत व्यक्तीला शेवटचा प्रवास तरी सुखाने करू द्या..! प्रा पवन मुंडे.
परळी प्रतिनिधी : शहरात सगळीकडे बहुचर्चित 110 कोटींच्या बोगस गरार योजनेच्या नावा खाली शहरात सर्वत्र चांगले रस्ते फोडून शहराचे वाटोळे तर केलेच आहे पण एखादा व्यक्ती मृत्यू पावला तर त्याचा अंतिम प्रवास तरी स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था दूर करून तो प्रवास तरी सुखाने करू द्या अशी मागणी भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.
शहरात स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच-पाणी साचले असून , तेथील पाण्याचा हौदात ले पाणी रोडवर आल्याने नागरिकांना तेथून जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे, या पाण्यातून अंत्यविधी साठी जाणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करत स्मशानभूमीत पोचावे लागत आहे, या मुळे एखाद्या मयत व्यक्तीचा अंत्यसंस्कार सुद्धा नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे व्यवस्थित नागरिक करू शकत नसून शहरातील मयत व्यक्तीला त्याचा शेवटचा प्रवास तरी सुखाने करू द्या अशी खरमरीत टीका नगरसेवक प्रा मुंडे यांनी केली आहे
No comments:
Post a Comment