बीड -- बीड शहरातील विविध नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे सचित्र प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भरविण्यात आले होते, या प्रदर्शनाचे उद्घाटन पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी नारळ फोडून व फित कापुन करण्यात आले. यावेळी दैनिक कार्यारंभ कार्यकारी संपादक बालाजी मारगुडे, दैनिक पुण्यनगरी बीडचे उपसंपादक संदिप लवांडे, साप्ताहिक बीड प्रहार चे संपादक अशोक होळकर ,दैनिक दिव्यअग्निचे बीड जिल्हाप्रतिनिधी बालाजी जगतकर, सामाजिक कार्यकर्ते के. के.वडमारे, सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड, आपचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, सचिव रामनाथ जमाले, शहराध्यक्ष सईद सादेक आदि उपस्थित होते. निवेदन नायब तहसीलदार (महसुल)जिल्हाधिकारी कार्यालय बीड बनकर यांना निवेदन देण्यात आले.
नगरपरिषदेचा ओडीएफ प्लस प्लस मानांकन रद्द करून ग्रामपंचायत दर्जा द्यावा:-डाॅ.गणेश ढवळे
_____
बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रातील अनाधिकृत बांधकाम,शासकीय ओढ्यातील अनाधिकृत बांधकाम, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसणे, अस्वच्छता, रस्त्यावरील खड्डे, रस्त्यावरील घनकचरा ,कचरा सफाई चे कंत्राटदार यांचे कंत्राट रद्द करावे , नाल्यांची साफसफाई नसणे ,रस्त्यावरील मोकाट जनावरांचे वास्तव्य, ठेकेदार पोसण्यासाठी कोट्यावधी रूपयांची निरुपयोगी बांधकामे, निकृष्ट दर्जाची भुयारी गटार योजना, कोरोनाने मृत अंत्यविधी निधीत गैरव्यवहार, आदि नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार पाहता व मुलभुत सुविधांचा अभाव पाहता नगरपरिषदेचा शासनाची दिशाभूल करून प्राप्त केलेला ओडीएफ प्लस प्लस मानांकन रद्द करून ग्रामपंचायतचा दर्जा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
मागण्या:-
1)बिंदुसरा नदीपात्रातील व शासकीय ओढ्यातील अनाधिकृत बांधकाम करणा-या ठेकेदार, व आर्थिक लाभापोटी नियमबाह्य काम करणारे नगरपरिषद कार्यालय तसेच नगररचनाकार तसेच भुमिअभिलेख कार्यालयातील आधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
2) शहरातील रोडवरील जागोजागी असणारे कच-यांचे ढीग पाहता सफाई कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात यावे.
3)वर्षानुवर्षे रखडलेले खोदुन ठेवलेले रस्ते तात्काळ पुर्ण करावेत.
4) शहरातील रस्त्यावरील खड्डे थातूरमातूर न बुजवता टीकाऊ काम करण्यात यावे.
5)महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत, संकेतस्थळावर खोटी माहीती प्रसिद्ध करून ओडीएफ प्लस प्लस प्राप्त मानांकन तात्काळ रद्द करण्यात येऊन चौकशी करण्यात यावी.
6)पावसाळा पुर्व नाल्याची साफसफाई केवळ कागदोपत्रीच दाखवून निधीचा गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात यावी.
7) बिंदुसरा नदीपात्रातील रेडझोन, पुरग्रस्त भागातील सारडा रेसिडन्सीच्या मागील तसेच ब्राम्हणवाडी-मंन्सुरशाह दर्गाह तसेच शिवाजी धांडे नगर भागातील अनाधिकृत बांधकाम प्रकरणात संबधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
8) बीड शहरातील जुने शहर ते पेठबीड भागाला जोडणा-या 600 वर्ष जीर्ण दगडी पुल दुरावस्थेत असून त्यावरून वाहतुक करणा-या दुचाकी, चारचाकी, जनावरे यांना धोका असून आवश्यक उपाययोजना करण्यात यावी, तसेच नदीपात्रातील झाडे, झुडपे, कचरा काढून नदिचे पात्र स्वच्छ करण्यात यावे.
9) कोरोना कालावधीत कोरानाने मयत अंत्यसंस्कार विधीसाठी निधीतील गैरव्यवहार प्रकरणातील संबधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
10)खासबाग-मोमीनपुरा बिंदुसरा नदीवरील नियोजित पुल तात्काळ बांधण्यात यावा.
11)बीड शहरातील रस्त्याच्या मध्यभागी असणा-या विद्युत रोहीत्र यांची जागा बदलण्यात येऊन भविष्यातील अपघात टाळावेत.
No comments:
Post a Comment