Sunday, October 31, 2021

डॉ.संतोष मुंडे यांच्याकडुन कराड कुटुंबियाचे सांत्वन.


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- 
 इंजेगाव येथील सरपंच विनायक कराड यांच्या मातोश्री अनुसयाबाई ज्ञानोबा कराड यांचे नुकतेच निधन झाले असुन रा.काँ.चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी भेट देवुन कराड कुटुंबियाचे सांत्वन केले.
       इंजेगावचे सरपंच विनायक कराड यांच्या मातोश्री अनुसया कराड यांचे नुकतेच निधन झाले.इंजेगाव व परिसरात धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा.डॉ.संतोष मुंडे यांनी कराड यांच्या इंजेगाव येथील निवासस्थानी आज रविवार दि.31रोजी भेट देत सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्रकार महादेव गित्ते आदी उपस्थित होते.

Wednesday, October 20, 2021

गेवराईत गुटख्याच्या गोदामावर छापा १७ लाखच्या मुद्देमालासह पाच आरोपी ताब्यात.

 

          *नेहमीप्रमाणे गुटखा पकडला अन मुळे आबा पळाला !

नेहमीप्रमाणे गुटखा पकडला अन मुळे आबा पळाला !

बीड - (प्रतिनिधी) जिल्हा पोलिस अधीक्षक आर रामस्वामी यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी स्थापन केलेल्या पथकाने चकलांबा हद्दीत विक्री होणाऱ्या गुटख्याच्या गोदामावर छापा घातला,नेहमीप्रमाणे गुटखा पकडला मात्र त्याचा जो मुळमालक आहे तो मुळे आबा पोलिसांना काही सापडला नाही .पोलिसांनी अनेक कारवाया (दाखवण्यासाठी का होईना) केल्या,गुटखा पकडल्याचा दाखवले मात्र याचा व्यापार करणारा किंग गुटखा माफिया मुळे आबा अजूनही पोलिसांना सापडलेला नाही .छापा घालणारे किंवा घालण्याचा आदेश देणारे कोणी ना कोणी त्याच्याकडून होणारी लक्ष्मीदर्शन मुळे उपकृत झाले असावेत त्यामुळेच हा माफिया खुलेआम फिरतो आहे .

दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 18.00 वाजता चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील उमापूर गावा लगतच्या मारुतीचीवाडी या वस्तीजवळ आरोपी नामे सोपान विठ्ठलराव भोसले यांच्या शेतामध्ये असलेल्या गोडाऊन मध्ये आयशर टेम्पो MH 11 M 4553 यामधून गुटखा उतरून गोडाऊन मध्ये काही इसम साठा करत असताना छापा मारला असता पाच इसमांना जागीच पकडण्यात आले.

त्यामध्ये 1)अजित अशोक पाटणे रा. उमापूर (गुटका मालक) 2) विठ्ठल विष्णू काठोळे रा. नामलगाव फाटा, बीड (टेम्पो चालक) 3) सुदाम बाबासाहेब काठोळे रा. नामलगाव फाटा,बीड (लेबर) 4) रामेश्वर विष्णू कातकडे रा. उमापूर (लेबर ) 5) नवनाथ अशोक राऊत रा.उमापुर (लेबर) आणि टेम्पो व गोडाऊनमधील एकूण 12 लाख 3 हजार 800 रुपये किमतीचा गुटका, सोबतचा आयशर टेम्पो 5 लाख रुपये किमतीचा जुनाअसा एकूण 17,03,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चकलांबा पोलिस ठाणे मध्ये जागीच पकडलेले 5 आरोपी आणि आयशर टेम्पो मालक, गुटख्याचा भागीदार मालक नामे बाळू बाबुराव बहिरवाळ उर्फ बाळू गुजर, गोडाऊन भाड्याने देणारे गोडाऊन चे मालक सोपान विठ्ठलराव भोसले असे 8 आरोपी विरुद्ध भादवि कलम 328, 272, 273,34 सह मोटार वाहन कायदा 130(3)/177 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे

Monday, October 18, 2021

माझी नाराजी काँग्रेस पक्षावर नसून पक्षातील स्वार्थी गटबाज नेत्यांवर आहे - राजकिशोर मोदी.


* स्वाभिमानाची लढाई ही स्वाभिमानानेच लढणार.

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- मागील 40 वर्षांपासून काँग्रेस पक्षात एकनिष्ठेने काम करणारे आणि बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवणारे राजकिशोर मोदी हे काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सर्वत्र रंगतांना दुसून येत होती .सामान्य कार्यकर्त्यांची देखील नाराजी उफाळून येत आहे . यासाठीच आज सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात होणारी घुसमट पाहून कार्यकर्त्यांची विचार मंथन बैठक आयोजित करण्यात आली होती . या विचार मंथनासाठी बीड , धारूर , केज तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते . यामध्ये बीड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महादेव धांडे , धारूर येथील अजयसिंह दीखत , पट्टीवडगाव सर्कल चे प्रा परमेश्वर वाकडे , बरदापुर सर्कलचे शेख महेबूब ,तसेच महाराष्ट्र कापुस पणन महासंघाचे उपाध्यक्ष ऍड विष्णुपंत सोळंके , अंबाजोगाई पिपल्स बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी , उद्योजक हकीम लाला ,किशोर परदेशी , अंबाजोगाई न प चे माजी उपाध्यक्ष मनोज लखेरा , रिकबचंद सोळंके , नगरसेवक महादेव आदमाणे , धम्मपाल सरवदे , सुनील व्यवहारे , ऍड इस्माईल गवळी , ऍड मिर्झा , राजेन्द्र मोरे आदी जनासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते . या विचार मंथन बैठकीत साहित्यिक दिनकर जोशी यांनी स्वाभिमान जोपासण्यासाठी माननीय नामदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्याच धर्तीवर आपला स्वाभिमान जोपासण्यासाठीच राजकिशोर मोदी यांनी देखील काँग्रेस सोडण्याचा निर्धार केला . ज्या पक्षात योग्य सन्मान नाही त्या ठिकाणी किती काळ थांबावे अशी भावना बोलून दाखविली . या विचार मंथनासाठी आलेले नगरसेवक महादेव आदमाणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . आमचे नेते राजकिशोर मोदी यांना गेली 25 ते 30 वर्षे संघर्षच करावा लागत आहे .पक्षातील काही जेष्ठ नेते आपले दिल्लीतील वजण वापरून आलेल्या संधी हिसकावून घेत आहेत .अश्या नेत्यांचं गावपातळीवर कुठल्याही प्रकारचे कार्य नाही . सदैव काम करणाऱ्या , कार्यकर्ते यांचे हित जोपासना करणारे आम्हा सर्वांचे नेते राजकिशोर मोदी यांच्या कामात खोडा घालण्यात सदैवच धन्यता मानतात .तसेच त्यांचा स्वाभिमान कसा दुखावला जाईल याची काळजी स्वयंभू गटबाज नेते घेत असतात .तेव्हा मोदींनी आता यावर विचार करून ठोस निर्णय घ्यावा आणि आम्ही सदैव तुमच्या सोबतीला असल्याची ग्वाही दिली . विचारमंथन बैठकीत काँग्रेसचे बीड तालुका अध्यक्ष महादेव धांडे यांनी देखील आपल्या भावनाना वाट करून देताना आपल्यालाही आलेल्या कटू अनुभवाची कैफियत मांडली आणि त्यांनी देखील मोदींच्या खांद्याला खांदा लावून सोबत काम करणार असल्याची स्पस्टोक्ती दिली . यावेळी पुणे येथील उद्योजक हकीम लाला यांनी सुध्दा आपण सदैव राजकिशोर मोदी यांच्या सोबतच राहू असे सांगताना त्यांनी आपणास आणि आपल्या कुटुंबियांच्या दुःखाच्या प्रसंगी धावून येऊन केलेल्या मदतीची आठवण काढली . यावेळी गवळी समाजाचे ऍड इस्माईल गवळी यांनी देखील आपले विचार मांडले .यावेळी बोलतांना गवळी यांनी सांगितले की गेल्या निवडणुकीत आमचेच काही मुस्लिम बांधव धर्माच्या नावाखाली अभि नही तो कभी नही म्हणून भूलथापा मारीत होते आणि आताही तसेच काही करण्यासाठी धडपड करतील तेव्हा अश्या भावनिक भूलथापांना बळी न पडता आम्ही सर्वजण राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करू या आणि त्यांनाच साथ देऊ अशी ग्वाही दिली . तसेच आमच्या बांधवांनी पुकारलेले शाईनबाग आंदोलनात मोदी यांनी केलेल्या सहकार्याची आठवण देखी समाजबांधव याना करून दिली . यावेळी पट्टीवडगाव सर्कलचे ऍड वाकडे यांनी देखील एका अतिसामान्य कार्यकरत्याला तालुक्याचे अध्यक्ष पद देऊन त्याचा सम्मान केल्याचं सांगून आपण आपल्या भागातील नागरिकांसोबत नेहमी मोदी यांच्याच सोबत राहनार असल्याचे सांगितले . यावेळी राधा सहकारी ग्राहक संस्थेचे अध्यक्ष किशोर परदेशी यांनी देखील आपले विचार मांडत आपण राजकिशोर मोदी यांच्या सोबतीला राहूनच कार्य करणार असल्याचे सांगितले .ऍड मिर्झा यांनी देखील यावेळू आपल्या भावना व्यक्त केल्या . आपल्या अत्यंत भावनाविवश मनोगतात पणन महासंघाचे उपाध्यक्ष ऍड विष्णुपंत सोळंके यांनी अश्रूंना आवर घालता आला नाही , बोलताना ते अत्यंत भावून झाले होते .त्यांनी स्वार्थी नेत्यांनी राजकिशोर मोदी यांची कशी गळचेपी केली याच पाढाच वाचला .स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणूक फॉर्म भरण्यासाठी गेल्यानंतर ऐन शेवटच्या क्षणी त्यांना निवडणूकीचा फॉर्म न भरण्याचे आदेश दिले .मागच्या दोनही विधान परिषदेच्या निवडणूकितही राजकिशोर मोदी यांचे नाव जाहीर होऊनही दिल्लीत बसून कटकारस्थान करून त्यावेळेस देखील त्यांना माघार घेण्यासाठी भाग पाडले .अश्या अनेक ठिकाणी त्यांच्या स्वाभिमान दुखावण्याचा आटोकाट प्रयत्न केला .मात्र मोदींनी न डगमगता अश्या कटू प्रसंगांना देखिल आनंदाने तोंड दिले . सर्व जमलेल्या कार्यकर्त्यांच्या मनोगतास उत्तर देताना राजकिशोर मोदी यांनी कार्यकर्त्याना संयम बाळगण्याचे आवाहन केले . त्यावेळी त्यांनी आपणास काँग्रेस पक्षाने अनेक संघी दिल्या व प्रत्येक वेळी आपण त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला . यामुळे आपण काँग्रेस पक्षाच्या दोष देणार नसून या पक्षातील स्वार्थी , कारस्थानी ,आणि गटबाज पुढाऱ्यांना दोषी मानतो असे स्पस्ट केले .यावेळी त्यांनी स्व बाबूरावजी आडसकर , विलासराव देशमुख , अशोक चव्हाण , मुजफ्फर हुसेन , आणि ना अमित देशमुख यांनी आपणास काँग्रेस पक्षाच्या केलेल्या सहकार्याची आठवण काढून त्यांचे आभार व्यक्त केले . पुढे बोलताना मोदी म्हणाले की आपण विद्यार्थी दशेपासून काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर चालत आलो आहोत .मागच्या 40 ते 45 वर्ष्यापासून आपण काँग्रेस पक्षाचे पाईक असून आज राजकिशोर पापा मोदी कुणी एकटा व्यक्त नसून तो समोर बसलेला हा शेकडोचा कार्यकर्त्यांचा जनसमुदाय आहे अशी मार्मिक स्पस्टोक्ती दिली .तुम्हा सर्वांच्या साथ आणि सहकार्यामुळेच गेली तीस वर्षे अंबाजोगाई नगर परिषद ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात ठेवू शकलो . आपण राजकारण करतांना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठीच समाजकारण देखील केले . पक्षाने संधी दिली नाही म्हणून आपण रडणाऱ्या पैंकी नसून आपण लढणारे कार्यकर्ते आहोत अशी दरपोक्ती दिली . पण कुणाकडून वारंवार जर आपल्या स्वाभिमानवर घाला घातला जात असेल तर त्यावर आता विचार करावा लागेल असेही पापा मोदी यांनी सांगितले .तेव्हा आपण सर्व जेष्ठ मंडळींशी विचार विनिमय करून पुढील दिशा ठरवू असे सांगितले तेव्हा सर्व कार्यकर्ते मंडळींनी संयम बाळगावा असे आवाहनही केले . आपण केवळ अंबाजोगाईतच नव्हे तर औरंगाबाद , मुंबई , दिल्ली येथेही अंबाजोगाई शहराची मान उंचावण्यासाठी प्रयत्न करून राज्यस्तरावर अंबाजोगाई शहराचे नाव आणि ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले . आपल्या काही विरोधकानी 25 वर्ष्याची न प ची सत्ता उलटवण्याचा प्रयत्न केला मात्र अश्या वेळी देखील जनता आपल्या सोबत राहून पुन्हा नगराध्यक्ष पद हे आपणाकडे दिले आणि आठ नगरसेवक निवडून दिले मात्र त्या आठ नगरसेवकांची संख्या पंचवीस पर्यंत नेण्यात आपण यशस्वी झाल्याचे देखील म्हणाले . आज आपण सर्वजण एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलो आहोत तेथे सर्वांनाच संधी देता येणार नाही तेव्हा कुणीही नाराज किंवा दुःखी न होण्याचे आवाहन शेवटी राजकिशोर मोदी यांनी केले . या विचारमंथन बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांसह सुनील वाघळकर , सचिन जाधव , राजेश इंगोले ,राणा चव्हाण , गणेश मसने , माणिक वडवणकर , शिरीष भावठाणकार , बबन मारवाल। , शरद काळे , प्रताप देवकर , रमेश कदम , मयूर लखेरा , सनी लखेरा , अमोल मिसळ , भारत जोगदंड ,दिनेश घोडके , शुभम लखेरा , योगेश चव्हाण , अजीम जरगर , अकबर पठाण , जुनेद सिद्दीकी , रणजित पवार , अतुल कसबे , चंद्रकांत महामुनी , जावेद गवळी , सुधाकर टेकाळे , महेबूब गवळी , विशाल पोटभरे ,आदी जण उपस्थित होते 

Sunday, October 17, 2021

परळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाने वेधले लक्ष. ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पुष्पवृष्टीने स्वागत.


*असंख्य हिंदूंच्या कार्यामुळेच अयोध्येतील श्रीराम मंदिर उभे राहत आहे – शरद हेबाळकर

प्परळी वैजनाथ ;- (प्रतिनिधी) राष्ट्रीय  स्वयंसेवक संघातर्फे घेण्यात येणाऱ्या वार्षिक उत्सवांपैकी एक असलेल्या विजयादशमी उत्सव 17ऑक्टोबर रविवार रोजी शहरातील औद्योगिक वसाहतीच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन परळी वैजनाथ शाखेतर्फे करण्यात आले होते.विजयादशमी उत्सवानिमित्त शहरात पथसंचलन करण्यात आले.पथसंचलनानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून शरद हेबाळकर (अखिल भारतीय इतिहास संकलन समिती, उपाध्यक्ष) अंबाजोगाई यांची उपस्थिती होती.

1982 पासून सुरू असलेल्या कार्याचे फळ म्हणूनच आज अयोध्येतील श्रीराम मंदिर होत आहे.यामध्ये हजारो साधूंना, रामभक्तांना बलिदान द्यावे लागले.संघटन रोजच्या शाखेतून चालते,संघाचे कार्य परिस्थिती निरपेक्ष आहे.असे शरद हेबाळकर यावेळी म्हणाले त्यांनी संघाच्या कार्याची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर वेरुळे,जिल्हा संघचालक प्रा.उत्तम कांदे,तालुका संघचालक डॉ.अजित केंद्रे व उपस्थित स्वयंसेवकांनी भगव्या ध्वजाला वंदना केली.या महोत्सवसाठी परळी तालुक्यातील स्वयंसेवक तथा राष्ट्रप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परळीत या वर्षी विजयादशमी उत्सवानिमित्त भव्य पथसंचलन करण्यात आले.घोष पथकाने सर्वांचे लक्ष वेधले तर संचलनादरम्यान राष्ट्रप्रेमींनी ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले.हे पथसंचलन औद्योगिक वसाहत सभागृह येथुन सुरू होऊन पुढे नाथ चित्र मंदिर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक,विद्यानगर,शंभू महादेव मंदिर,श्री गजानन महाराज मंदिर परिसर,जलालपूर रोड मार्गे औद्योगिक वसाहत येथे या संचलनाची सांगता करण्यात आली.या संचलनासाठी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, October 15, 2021

अ.भा.वारकरी मंडळाच्या वतीने कु.प्रतीक्षा मुंडे व प्रा.सौ.चेतनाताई गौरशेटे यांचा सत्कार करण्यात आला.


परळी वैजनाथ (वार्ताहर) अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने राष्ट्रीय पैलवान महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कु.प्रतीक्षा सूर्यकांत मुंडे यांचा सत्कार करण्यात आला तर अ.भा.वारकरी मंडळाच्या परळी  तालुका संपर्क प्रमुख प्रा. सौ.चेतनाताई गौरशेटे यांची महाराष्ट्राची नवदुर्गा हा  पुरस्कार मिळाल्या बद्दल आज विजया दशमी दसरा या शुभ मोहर्तावर सत्काराचे आयोजन अखिल भारतीय वारकरी मंडळ मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे व कन्हैया वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष गोविंद महाराज मुंडे सचिदानंद महाराज गित्ते यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात सत्कार मुर्तीना शाल श्रीफळ फेटा बांधून पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला उपस्थितांनी भरभरून प्रतिक्षा व सौ.गौरशेटे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ढाकणे सर व कोकाटे महाराज बोलतांना म्हणाले की कु.प्रतीक्षा ही परळी ची कंन्या आता नसुन ती आता महाराष्ट्राची कंन्या झाली तीच्या या यशस्वी बद्दल महाराष्ट्रात तीने गगन उंच भरारी तीने घेतलेली आहे आम्ही परळीकर सर्व तुझ्या पाठीशी आहोत महाराष्ट्र राज्याचे न्याय मंञी तथा बीड जिल्हा पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब व गट नेते वाल्मीक आण्णा कराड हे आपल्या पाठीशी आहेत त्यांचा मार्ग दर्शनाने महाराष्ट्रात नव्हे तर पुर्ण जगात आपले नाव व किर्ती होयील कु.प्रतीक्षा व प्रा.सौ.गौरशेटेताईना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास उपस्थित ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, ह.भ.प.बंडोपंत महाराज ढाकणे, ह.भ.प.गोविंद महाराज मुंडे,चव्हाण सर, नंदनंजकर, ह.भ.प.सचिदानंद महाराज गित्ते, ह.भ.प.राम महाराज मुंडे, कवि कांबळे सर, ह.भ.प.अशोक महाराज कराळे, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कतारे, ह.भ.प.जनक महाराज कदम, ह.भ.प.श्रीराम महाराज मुंडे,यांच्या उपस्थितीत सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला सुञसंचल व आभार कवि कांबळे सर यांनी मानले

Thursday, October 14, 2021

ताई भक्तांनाही दोन वर्षापासून बोलायचंय.ब्रम्हगाव ते सावरगाव घाट रस्त्यावर ओतलेले चार कोटी कोणी गिळले ?

 
*निकृष्ठ रस्त्याबाबत पंकजाताईंनी मौन सोडण्याची डॉ.गणेश ढवळे यांची मागणी*

बीड - (प्रतिनिधी): मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. दोन वर्षांमधल्या खूप गोष्टी मनामध्ये साठलेल्या आहेत. तुमचंही ऐकायचंय, मलाही बोलायचं आहे, असं म्हणत पंकजाताई मुंडे यांनी सावरगाव घाट येथे होणार्‍या मेळाव्याला येण्याचं अवाहन त्यांच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. दरम्यान सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केल्यानंतर पंकजाताईंनी या गावाला जोडणारे सगळ्या रस्त्यांवर कोट्यावधीचा निधी टाकून मंत्री असतानाच्या काळातच ते करवून घेतले. मात्र दोन वर्षातच या रस्त्याची काय अवस्था झाली हे देखील एकदा पंकजाताईंनी आपल्या उघड्या डोळ्यांनी बघावे. ब्रम्हगाव- मुगगाव- सावरगाव घाट या रस्त्यावर पंकजाताईंनी थोडा-थोडका नव्हे तर 4 कोटी 43 लाख रुपयांचा निधी ओतला आहे. आता हा निधी नेमका कुणी गिळला याचा शोध पंकजाताईंनी घेऊन संबंधीत ठेकेदाराचे कान पिळून रस्ता पुन्हा करवून घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी सावरगावघाट (भक्तिगड) येथिल भक्तांची सोय व्हावी म्हणून आ. सुरेश धस यांच्या विनंतीवरून ब्रम्हगाव -मुगगाव -सावरगावघाट या रस्ता दुरूस्तीसाठी 4 कोटी 43 लाख रूपयांचा निधी मंजूर करून दिला. परंतु हे काम ज्या कार्यकर्त्याला दिले तो तर बोगसच निघाला पण त्यानं रस्ता देखील अत्यंत बोगस करून संपूर्ण निधी हडपण्याचं काम केलं. सावरगाव घाट हा आता पंकजाताई यांच्या जिव्हाळ्याचा विषय, पंकजाताईंच्याच कार्यकर्त्याने हा रस्ता करताना एवढी नितीमत्ता का सोडली? हा रस्ता किमान पाच वर्षे तरी टिकायला हवा होता. मात्र केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात रस्त्याचा पोपडा झाला आहे. पैठण-पंढरपूर या महामार्गाची डॉ.ढवळे यांनी पोलखोल केल्यानंतर पंकजाताईंनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना ट्विट करीत त्यांना असले काम आवडणार नाही, असे म्हटले. मग आता सावरगाव घाटच्या या रस्त्याचे काम ढळढळीत निकृष्ठ दर्जाचे झालेले असताना पंकजाताई ते आवडले का? असा सवाल डॉ.ढवळे यांनी केला आहे. हा रस्ता इतका खराब करणे म्हणजे लाखो भक्तांच्या काळजाला ठेस लागण्यासारखे आहे. संबंधीत ठेकेदारावर कारवाई न झाल्यास वेगळ्या आंदोलनाचा विचार करावा लागेल असा ईशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिला आहे.


Wednesday, October 13, 2021

थकीत वेतन मिळणार ! एस.टी.च्या कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार.




 मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील एसटी कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांचा  थकीत वेतनाचा प्रश्न सुटला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला मानव विकास कार्यक्रमातंर्गत दुसर्‍या टप्प्यातील 231 कोटी 30 लाखाचा निधी मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय लगेट निर्गमित करण्यात आला आहे.

परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या 93 हजार कर्मचार्‍यांचा थकीत वेतनाचा प्रश्न सुटला आहे. लवकरच एसटी कर्मचार्‍यांना सप्टेबर महिन्याचे वेतन देण्यात येईल. थकीत वेतन मिळणार असल्याने एसटी कर्मचार्‍यांची दिवाळी चांगली जाणार आहे.

ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे, या करीता गाव ते शाळा दरम्यान वाहतुकीची मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ’मानव विकास कार्यक्रम’ अंतर्गत योजना राबविली जाते. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी दिला जातो.

या योजनेतंर्गत एसटी महामंडळाच्या बस वाहतूकीच्या खर्चापोटी राज्य शासनाकडून सन 2013-14 पासून रक्कम देणे प्रलंबित होते. तसेच इंधन किमतीची दरवाढ, चालनीय किलोमीटर तफावत, चालक आणि वाहक यांचे वेतनवाढ,

बसेसच्या देखभाल व दुरुस्तीचा वाढीव खर्च आदी विचार करुन पुर्वलक्षी प्रभावाने  2013-14पासून वाढीव दराने अनुदान देण्याबाबत मंत्री परब यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची वेळोवेळी बैठक घेऊन एसटी महामंडळास एकूण 428 कोटी 88 लाख 62 हजार 200 इतका निधी मंजूर करुन घेतला.

तो निधी देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन मे, 2021 महिन्यात पहील्या टप्यातील 197 कोटी 58 लाख 40 हजार रुपायांच्या अनुदानाची रक्कम यापर्वीच एसटी. महामंडळाला मिळाली आहे.

दरम्यान, दुसर्‍या टप्प्यातील 231 कोटी 30 लाख 22 हजार 200 रूपयांचा निधी एसटी महामंडळाला देण्याबाबत निर्देश संबंधित विभागाला राज्य शासनाने दिले आहेत. या निधीमधून एसटी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वेतन मिळणार असल्यामुळे आता एसटी कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे एसटी कर्मचार्‍यांमधून स्वागत केले जात आहे.

पंकजाताई मुंडे, खा.डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी घेतले योगेश्वरी देवीचे दर्शन.


*बळीराजाचे संकट दूर कर ; कोरोना नाहीसा होऊ दे यासाठी देवीला घातले साकडे.

अंबाजोगाई (प्रतिनिधी ) भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी आज महाष्टमी निमित्त श्री योगेश्वरी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. अतिवृष्टीत बळीराजावर आलेले संकट दूर कर, कोरोना नाहीसा होऊ दे असे साकडे त्यांनी यावेळी देवीला  घातले. 

  नवरात्रोत्सव निमित्त पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे दरवर्षी परंपरेनुसार योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी शहरात आल्या होत्या. सकाळी भगवान बाबा चौकात कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले, त्यानंतर मंदिरात जाऊन त्यांनी  आदिशक्ती योगेश्वरी मातेची मनोभावे पूजाअर्चा केली आणि दर्शन घेतले. अन्नदात्या बळीराजाला सर्व संकटातून मुक्त कर आणि कोरोनाचे संकट टळू दे अशी प्रार्थना आदिशक्ती चरणी केली.

  यावेळी आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, गयाताई कराड , भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, गणेश कराड, नेताजी देशमुख, कमलाकर कोपले, शाम आपेट, हिंदूलाल काकडे, सुनील लोमटे, संजय गंभीरे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
••••

मराठा आरक्षणप्रश्नी खा.छत्रपती संभाजी राजे पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर !



आरक्षणप्रश्नी खा छत्रपती संभाजी राजे पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर !

मुंबई – मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकार जाणीवपूर्वक लांबवत आहे, दिलेली मुदत संपल्याने आपण रायगडापासून पुन्हा नव्याने राज्याचा दौरा येत्या 25 ऑक्टोबर पासून करणार असल्याची घोषणा खा छत्रपती संभाजी राजे यांनी केली .

येत्या 25 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी दौरा करणार आहे. रायगडपासून या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. राज्य सरकारने आश्वासन देऊनही काहीच केलं नाही. सारथीचा एक मुद्दा सोडला तर इतर मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

राज्य सरकार राज्याची जबाबदारी पाळत नाही. सरकारला अल्टिमेटम दिला होता. पण त्यांनी आश्वासन पाळलं नाही. आता चर्चेला जाण्याचा विषयच नाही, आता आणखी काय चर्चा करायची?, असा उद्विग्न सवालही त्यांनी केला. तसेच कुणी टीका करतयं त्याकडे मी लक्ष देत नाही. टीकाकारांना विनंती आहे त्यांनी आपला वेळ समाजासाठी द्यावा, असं ते म्हणाले.

मराठा आरक्षणाची मशाल चुकीच्या व्यक्तीच्या हातात असल्याची टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी मतभेद असल्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावली. सातारा गादी आणि कोल्हापूरच्या गादीमध्ये कोणताही मतभेद नाही. उदयनराजे नेमकं काय म्हटले हे मला माहीत नाही, असंही ते म्हणाले.

एकतर्फी प्रेमातून आठवीच्या मुलीची निर्घुण हत्या…दोघांना अटक…पुण्यातील धक्कादायक प्रकार.



पुणे (प्रतिनिधी ) – पुणे शहरातील बिबवेवाडी येथे मंगळवारी संध्याकाळी एका 14 वर्षीय किशोरची तीन जणांनी चाकूने निर्घृण हत्या केली. मुलगी कबड्डी सरावासाठी जात असताना ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.घटनेच्या काही तासांनंतर दोन अल्पवयीन आरोपींना पकडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार हत्या झालेली मुलगी इयत्ता आठवी वर्गात शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईकच आहे. या आोरपीसोबत अन्य दोन व्यक्ती होते. हत्येआधी मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी तिचा नातेवाईक तसेच इतर दोघे तिच्याकडे आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली. यातच अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा अत्यंत रागामध्ये अल्पवयीन मुलीकडे आला होता. मुलगी कबड्डी खेळण्यात मग्न होती. मात्र आरोपीने मुलीवर कोयत्याने सपासप वार केले. थेट मानेवर वार केल्यामुळे काही समजायच्या आत मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपीने फक्त मानेवरच आणखी वार केले. आरोपीने अत्यंत अमानुषपणे मुलीचा खून केला. तसेच या मुलीचे डोके धडापासून वेगळे करण्याचा मानस या ओरपींचा होता की काय ? अशी शंका अपस्थित केली जात आहे.
Ad
मिळालेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीने मुलीचा खून केला त्याच्याकडे कोयता तसेच पिस्तुलदेखील होते. मात्र, खून करताना रागाच्या भरात त्याने कोयत्याचा उपयोग केला. तर खून केल्यानंतर पिस्तूल घटनास्थळीच फेकून देत पळ काढला. दरम्यान, या अत्यंत भीषण खुनामुळे बिबवेवाडी तसेच पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

“तथापि, आम्ही दोन आरोपींना पकडण्यात यशस्वी झालो, जे अल्पवयीन आहेत, तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे,” तो म्हणाला. जावरे म्हणाले की, आरोपी 22 वर्षीय शुभम भागवत हा मुलीचा दूरचा नातेवाईक आहे आणि तिच्या घरी राहायचा. तो म्हणाला की ‘तो मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडला असल्याने, मुलीच्या पालकांनी त्याला घर सोडण्यास सांगितले होते.’

पोलीस उपायुक्त (झोन -5) नम्रता पाटील यांनी सांगितले की, त्यांना घटनास्थळावरून खेळणीच्या बंदुकीसारखे दिसणारे पिस्तूल सापडले. पाटील म्हणाले की, पोलीस त्याच्या सत्यतेची चौकशी करत आहेत. त्याचवेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार, जे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, यांनीही या घटनेचा निषेध केला आहे आणि पोलिसांना या प्रकरणी त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे.

Friday, October 8, 2021

*दिव्य ज्योति जाग्रति संस्थान द्वारा आयोजित सात दिवसीय श्री राम कथेचा लाभ घ्या.*


           प्रभू श्रीराम सृष्टीच्या प्रत्येक कणा-कणात वास करतात आणि त्यांची पवित्र कथा सध्याच्या प्रत्येक समस्येवर एक समग्र उपाय आहे. दिव्य ज्योति जाग्रति संस्थानचे संस्थापक आणि संचालक *दिव्य गुरु श्री आशुतोष महाराज जी* यांचे कथन आहे  - *"श्री रामांची कथा ऐकण्याचे खरे फळ म्हणजे आपल्याला भगवान श्री रामांचे प्रत्यक्ष दर्शन घडते."*

               दिव्य ज्योति जाग्रति संस्थेतर्फे देि.09 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत श्री राम कथेचा एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, जेणेकरून समाजाला श्री रामांची दिव्य कथा श्रवण करावयास  मिळेल. ही कथा केवळ श्री रामांच्या कथांपुरती मर्यादित राहणार नाही, तर श्री रामाला भेटण्याच्या शाश्वत पद्धतीशीही सर्वांना परिचित करून देईल.
             या कार्यक्रचा लाभ जगभरातील सर्व भक्तांना  घेता यावा म्हणून ही पवित्र कथा संस्थेच्या यूट्यूब चॅनेलवर  - डीजेजेएस वर्ल्ड देि.09 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत रोज सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत प्रसारित केली जात आहे.

         कोविड महामारीमुळे पसरलेल्या नकारात्मकतेमध्ये जनमाणसात दिव्यता व सकारात्मकतेच्या उद्देशाने संस्थेने अद्वितीय डिजिटल कथा महोत्सव  - *ब्रह्म एव शांती:ब्रह्म एव आनंद:* च्या अंतर्गत ही कथा आयोजित केली आहे. या कथेचे वाचन दिव्य गुरु श्री आशुतोष महाराज जींची शिष्या - विश्वविख्यात श्रीराम कथाव्यास - साध्वी श्रेया भारती जींच्या द्वारे केले जाईल. साध्वी जींनी रामचरितमानस मध्ये वर्णित श्रीरामांच्या लीलांमध्ये दडलेल्या गुढ अध्यात्मिक रहस्यांना  उलगडून असंख्य श्रद्धाळूंना भक्तिमार्गाकडे प्रेरित केले आहे.  या विलक्षण डिजिटल कथा महोत्सवाबद्दल अधिक माहितीसाठी, अवश्य भेट द्या - www.djjs.org/katha.

           कथेचे मुख्य आकर्षण पुढील प्रमाणे आहे - भगवान रामांचा अवतार हा उत्सव का आहे? मनरुपी रावणाचा वध कसा करावा ? खऱ्या अर्थाने राम राज्य म्हणजे काय? राम हा माणन्याचा  विषय आहे की जाणन्याचा? अश्या अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांचे उदाहरणासह समाधान भगवान श्री रामांच्या  लीलांचे ज्ञानवर्धक विश्लेषण, देिव्य  गुरू श्री आशुतोष महाराज जींच्या समर्पित युवा शिष्यांद्वारे सुमधुर भजन कार्यक्रम, येजमानांद्वारे  घरी बसल्या डिजिटल पूजा व पवित्र आरती.
 
       भगवान श्री राम संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श आहेत. आपण ही त्यांच्या गुणांना  आत्मसात करावे हेच या आगामी कथेचे औचित्य आहे.आध्यात्मिक आणि प्रेरणादायी विचारांना नियमित प्राप्त करण्यासाठी  DJJS YouTube चॅनेलची सदस्यता घ्या - http://www.youtube.com/djjsworld आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा.

        दिव्य ज्योति जाग्रति संस्थान ही एक सामाजिक आणि आध्यात्मिक संस्था आहे. जी विश्वात शांतता आणि बंधुत्व प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत आहे. जी आपल्या नऊ मुख्य प्रकल्पांद्वारे समाजात मोठ्या प्रमाणात बदल आणत आहे. हे नऊ प्रकल्प म्हणजे - महिला सशक्तिकरण कार्यक्रम; साक्षरता अभियान; सम्पूर्ण स्वास्थ्य कार्यक्रम; नशा उन्मूलन कार्यक्रम; पर्यावरण संरक्षण कार्यक्रम; भारतीय देशी गो संवर्धन एवं नस्ल सुधार कार्यक्रम; आपदा प्रबंधन कार्यक्रम; बंदी सुधार कार्यक्रम, नेत्रहीन व दिव्यांग सशक्तिकरण कार्यक्रम.

Thursday, October 7, 2021

मोठी बातमी! महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्राचा अलर्ट.


नवी दिल्ली(कांतीकारी साथी न्युज ) महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सकाळी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने महाराष्ट्रासह पाच राज्यांना अलर्ट दिला आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटक आदी पाच राज्यात 10 हजाराहून कोरोनाचे सक्रिय रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या पाच राज्यांनी डोकेदुखी वाढवल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

कोरोनाचं आव्हान अजूनही संपुष्टात आलेलं नाही. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रित करण्यात आपण काही प्रमाणात अपयशी ठरल्याचं म्हणू शकतो. आपल्याला निरंतर प्रयत्न करण्याची गरज आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटकात दहा हजारांपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आढळले आहेत, असं आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर . महाराष्ट्रातून 'या' नेत्यांना संधी.


नवी दिल्ली (कांतीकारी साथी न्युज ) जेपी नड्डा यांनी आज भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 80 जणांची ही जम्बो कार्यकारिणी आहे. या कार्यकारिणीतून भाजपविरोधात रणशिंग फुंगकणारे युवा नेते वरुण गांधी यांना डच्चू देण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर या कार्यकारिणीतून मनेका गांधी यांनाही वगळण्यात आलं आहे. नव्या राष्ट्रीय कार्यसमितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, पीयूष गोयल आदींचा समावेश कायम आहे. तर, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचाही राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

नव्या राष्ट्रीय कार्यसमितीत 50 विशेष आमंत्रित आणि 179 स्थायी सदस्य असणार आहेत. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेतील नेते, माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रीय मोर्चांचे अध्यक्ष, प्रदेश प्रत्रारी, सह प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आदींचा समावेश करण्यात आला आहे.


कार्यकारिणीत 309 सदस्य

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण 309 घोषित सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यकारिणीत मनेका गांधी आणि लखीमपूर हिंसेवरून योगी सरकारला आरसा दाखवणारे वरुण गांधी यांना स्थान देण्यात आलं नाही. मात्र, मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन आणि रविशंकर प्रसाद यांना कार्यकारिणीत घेण्यात आलं आहे.


महाराष्ट्रातून कोण?

राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, राष्ट्रीय सचिव म्हणून महाराष्ट्रातून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे यांचा समावेश कायम आहे. तर विशेष निमंत्रितांमध्ये सुधीर मुनंगटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणींचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून सुनील वर्मा, हिना गावित, यांची वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश करण्यात आला आहे. राज्य प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांना कायम ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून सीटी रवी, ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैय्या यांची नियुक्ती कायम ठेवली आहे.


राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र

नितीन गडकरी

पीयूष गोयल

प्रकाश जावडेकर

डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

चित्रा वाघ


राष्ट्रीय सचिव

विनोद तावडे

सुनील देवधर

पंकजा मुंडे


विशेष निमंत्रित

सुधीर मुनंगटीवार

आशिष शेलार

लड्डाराम नागवाणीं


राष्ट्रीय प्रवक्ते

सुनील वर्मा

हिना गावित


माजी मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस


राज्य प्रदेशाध्यक्ष

चंद्रकांत पाटील


महाराष्ट्राचे प्रभारी

सीटी रवी,

ओमप्रकाश धुर्वे

जयभान सिंग पवैय्या

घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी सणासुदीच्या काळात वारंवार खंडित वीजपुरवठ्या मुळे नागरिक हैराण..!


*भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता आंबटकर यांना घेतला घेराव..!

*शहरात "अखंडित वीज पुरवठा" करणे बाबत घेतले लेखी आश्वासन..!.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी): गेल्या अनेक दिवसांपासून परळी शहरात विद्युत विभागाच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असलेल्या नागरिक वैतागले आहेत,सध्या दसरा-दिवाळी या सणासुदीच्या काळात तरी शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी आज परळी शहर भाजपा कार्यकर्त्यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता आंबटकर यांना घेराव घेऊन जाब विचारला.
    मागील अनेक दिवसांपासून शहरात सतत जाणाऱ्या विजे मुळे शहरातील नागरिक परेशान झाले असून अनेक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर सुद्धा याचा विपरीत परिणाम झाला आहे,सध्या नवरात्र-दसरा व येणाऱ्या काळात दिवाळी अशा सणासुदीच्या दिवसात तरी वीज पुरवठा खंडित होऊ नये ही नागरिकांची अपेक्षा आहे,याचाच  धागा पकडून आज शहरातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महावितरण चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आंबटकर यांना घेराव घेऊन सतत च्या जाणाऱ्या विजे बद्दल संतप्त कार्यकर्त्यांनी जाब विचारून धारेवर चांगलेच धरले,या यावेळी आंबटकर यांनी येणाऱ्या काळात वीज खंडित होऊ देणार नाही असे लेखी आश्वासन कार्यकर्त्याना दिले.या प्रसंगी जेष्ट नेते श्रीराम मुंडे, भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे,महादेव इटके, अश्विन मोगरकर, सचिन गित्ते,नितीन समशेट्टे, सुशील हरंगुळे,रोहिदास बनसोडे,विकास हालगे, वैजनाथ रेकने,विजय दहिवाळ, दिलीप नेहरकर,पवन तोडकरी,पवन मोदाणी,श्रीनिवास राऊत,ज्ञानेश्वर मुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Wednesday, October 6, 2021

नवरात्रोत्सवात व्रत-उपवास व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसे फायदे देतात.


*_श्री. आशुतोष महाराज जी,_*
*_(संस्थापक आणि संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान)_

                भारतात शक्ती उपासनेच्या अनेक विधी आहेत, ज्या की भक्तांनी त्यांच्या श्रद्धेच्या आधारे तयार केल्या आहेत. यापैकी एक म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेच्या दिवसांमध्ये केले जाणारे व्रत-उपवास म्हणजेच नवरात्र!  'व्रता'चा सामान्य अर्थ संकल्प किंवा दृढनिश्चय आहे. 
                नवरात्रांच्या नऊ दिवसांत उपवास करण्याचा अर्थ म्हणजे तामसिक-राजसिकतेचा त्याग करून सात्विक आहार-विहार-वर्तन स्वीकारून आदि-शक्तीची उपासना करण्याचा संकल्प होय. वर्षातून दोनदा शक्तीपूजेचा प्रसंग येतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, या दिवशी अन्न सोडून फळ किंवा इतर सात्विक अन्नपदार्थ का खावे? पहिली नवरात्र चैत्र महिन्यात व दुसरी अश्विन महिन्यात येते.ही अशी वेळ आहे जेव्हा दोन ऋतूंचा संगम असतो. ऋतुंच्या संधिकाळाच्या दरम्यान रोग होण्याची शक्यता वाढते. हेच कारण आहे की, जर संधीकाळाच्या वेळी संयम ठेवून उपवास केला तर आपण अनेक रोगांपासून सुरक्षित राहतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचे आहे.

नवरात्रीच्या उपवासाने आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.  
*शरीरातील विष निवारण-* निराहार राहिल्याने किंवा फळे खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पचनसंस्थेला विश्रांती मिळते. 

*रोगांवर प्रतिबंध-* असे अनेक रोग आहेत, जे उपवास केल्याने सहज टळतात. जसे लठ्ठपणावर नियंत्रण, हृदयरोग आणि कर्करोगाचे प्रतिबंध इ. कारण फळे, फळांचा रस आणि न तळलेले अन्न विषमुक्त व चरबीमुक्त असतात.

*मानसिक तणावावर नियंत्रण-* निराहारातून विषारी पदार्थ बाहेर पडतात, आणि लसिका प्रणाली सुधारली जाते. रक्त परिसंचरण चांगले होते, हृदयाचे कार्य सुधारते. यामुळे मानसिक शक्ती वाढते. तणाव कमी होऊ लागतो. हलके अन्न खाल्ल्याने मनही हलके राहते.

*री हायड्रेशन/अंतर्गत अवयवांचे सिंचन -* उपवास करताना कमी अन्न खाणे आणि जास्त पाणी पिणे, यामुळे शरीराच्या अंतर्गत भागांचा कोरडेपणा दूर होतो. हातपाय आणि त्वचा पुन्हा हायड्रेटेड म्हणजेच ते सिंचन करतात. पचनसंस्थाही चांगले कार्य करते.

*शरीर आणि मनाचे सुशोभिकरण -* उपवासाच्या नऊ दिवसांमध्ये, दिनचर्या आणि जेवणात इतके बदल होतात की, त्याचा तुमच्या त्वचेवरही परिणाम होतो. विशेषतः फळे आणि शेंगदाणे यांच्या सेवनाने त्याचा थेट संबंध आपल्या शरीरातील कमी होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेशी आहे. या व्यतिरिक्त, जास्त प्रमाणात द्रव पदार्थ व पाणी पिण्याने आतडे स्वच्छ होतात त्यामुळे शरीर आणि त्वचेलाही सहजपणे तेज मिळते. शरीराच्या शुद्धीकरणामुळे मनातील विचारांमध्ये शुद्धता येते आणि बुद्धीचाही विकास होतो. सात्विक आहारामुळे सात्त्विक प्रवृत्ती विकसित होते, ज्यामुळे मनाला शुभ विचार आणि संकल्पांकडे नेले जाते.
              वरील विश्लेषणाद्वारे, आपणास हे लक्षात आले असेल की, नवरात्र आणि इतर वेळी केले जाणारे व्रत उपवास शारीरिक आणि मानसिक दोन्ही फायदे कसे प्रदान करतात. म्हणून, आपण आपल्या प्रकृतीनुसार नवरात्र दरम्यान व्रत उपवास करू शकता. तसेच, पूर्ण सदगुरूंकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करून ईश्वराचे चिंतन करा, जेणेकरून या महाशक्तीच्या विशेष रात्रींमध्ये आपली आध्यात्मिक उन्नती देखील होईल, आपण देवीची शाश्वत भक्ती प्राप्त करून आपले जीवन यशस्वी करू शकतो, हे या उत्सवाचे मुख्य ध्येय आहे. *दिव्य ज्योति जाग्रति संस्थान कडून नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.*

Tuesday, October 5, 2021

वनपरिक्षेत्र परळी अंतर्गत श्री.केदारी महाराज विद्यामंदीर,नंदनज येथे वन्यजीव सप्ताह साजरा.


परळी वैजनाथ ;- महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाच्यावतीने दि.1अॉक्टोंबर ते दि.7 अॉक्टोंबर दरम्यान राज्यात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे.त्यानिमित्ताने 4 अॉक्टों.रोजी शाळा सुरु होण्याच्या पहील्याच दिवशी शाळेत उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांचा पुष्प गुच्छ देऊन स्वागत करुन वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
प्रास्ताविकात सामाजिक कार्यकर्ते वृक्षमित्र चेतन सौंदळे यांनी वन्यजीव सप्ताह-21बाबती माहिती विषद करून विद्यार्थ्यांना पक्षी संवर्धन,पक्ष्यांची घरटे तयार करणे वन्यजीव व वृक्ष लागवडीचे महत्तव पटवून दिले तसेच अंबेजोगाई येथील वनपाल श्री.जी.बी.कस्तुरे यांनी वन्यजीव संरक्षण बाबतची माहिती देऊन मानव -वन्यजीव संघर्ष निर्माण होण्याची कारणे व अन्न साखळीतील एक सुध्दा प्राणी कमी झाला तर त्याचे होणारे दुष्परिणाम  समजावून सांगितले.
  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.भागवत कराड,अंबेजोगाई वन विभागाचे वनपाल श्री.जी.बी.कस्तुरे ,वनपाल श्री.सी.एच.राठोड,श्री.एस.जे.राऊत,सौ.पी.जे.तागड, शाळेतील शिक्षक श्री.सुनील गर्जे सर, श्री.आर.बी.मुंडे सर,श्री.एल.पी.फड सर,श्रीधर गुट्टे सर,श्री.रामेश्वर नागरगोजे सर,श्री.रणवीर वाव्हळे सर,श्री.तांदळे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Monday, October 4, 2021

बीड नगरपरीषदेच्या सचित्र विकासकामांचे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते उद्घाटन:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर.


बीड -- बीड शहरातील विविध नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे सचित्र प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भरविण्यात आले होते, या प्रदर्शनाचे उद्घाटन पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी नारळ फोडून व फित कापुन करण्यात आले. यावेळी दैनिक कार्यारंभ कार्यकारी संपादक बालाजी मारगुडे, दैनिक पुण्यनगरी बीडचे  उपसंपादक संदिप लवांडे, साप्ताहिक बीड प्रहार चे संपादक अशोक होळकर ,दैनिक दिव्यअग्निचे बीड जिल्हाप्रतिनिधी बालाजी जगतकर, सामाजिक कार्यकर्ते के. के.वडमारे, सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड, आपचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, सचिव रामनाथ जमाले, शहराध्यक्ष सईद सादेक आदि उपस्थित होते. निवेदन नायब तहसीलदार (महसुल)जिल्हाधिकारी कार्यालय  बीड बनकर यांना निवेदन देण्यात आले. 

नगरपरिषदेचा ओडीएफ प्लस प्लस मानांकन रद्द करून ग्रामपंचायत दर्जा द्यावा:-डाॅ.गणेश ढवळे 
_____
 बीड शहरातील  बिंदुसरा नदीपात्रातील अनाधिकृत बांधकाम,शासकीय ओढ्यातील अनाधिकृत बांधकाम, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसणे, अस्वच्छता, रस्त्यावरील  खड्डे, रस्त्यावरील घनकचरा ,कचरा सफाई चे कंत्राटदार यांचे कंत्राट रद्द करावे  , नाल्यांची साफसफाई नसणे ,रस्त्यावरील मोकाट जनावरांचे वास्तव्य, ठेकेदार पोसण्यासाठी कोट्यावधी रूपयांची निरुपयोगी बांधकामे, निकृष्ट दर्जाची भुयारी गटार योजना, कोरोनाने मृत अंत्यविधी निधीत गैरव्यवहार, आदि नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार पाहता व मुलभुत सुविधांचा अभाव पाहता नगरपरिषदेचा शासनाची दिशाभूल करून प्राप्त केलेला ओडीएफ प्लस प्लस मानांकन रद्द करून ग्रामपंचायतचा दर्जा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

मागण्या:-
1)बिंदुसरा नदीपात्रातील व शासकीय ओढ्यातील अनाधिकृत बांधकाम करणा-या ठेकेदार, व आर्थिक लाभापोटी नियमबाह्य काम करणारे नगरपरिषद कार्यालय तसेच नगररचनाकार तसेच भुमिअभिलेख कार्यालयातील आधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. 
2) शहरातील रोडवरील जागोजागी असणारे कच-यांचे ढीग पाहता सफाई कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात यावे. 
3)वर्षानुवर्षे रखडलेले खोदुन ठेवलेले रस्ते तात्काळ पुर्ण करावेत. 
4) शहरातील रस्त्यावरील खड्डे थातूरमातूर न बुजवता टीकाऊ काम करण्यात यावे. 
5)महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत, संकेतस्थळावर खोटी माहीती प्रसिद्ध करून ओडीएफ प्लस प्लस प्राप्त मानांकन तात्काळ रद्द करण्यात येऊन चौकशी करण्यात यावी. 
6)पावसाळा पुर्व नाल्याची साफसफाई केवळ कागदोपत्रीच दाखवून निधीचा गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात यावी. 
7) बिंदुसरा नदीपात्रातील रेडझोन, पुरग्रस्त भागातील सारडा रेसिडन्सीच्या मागील तसेच ब्राम्हणवाडी-मंन्सुरशाह दर्गाह तसेच शिवाजी धांडे नगर भागातील अनाधिकृत बांधकाम प्रकरणात संबधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. 
8) बीड शहरातील जुने शहर ते पेठबीड भागाला जोडणा-या 600 वर्ष जीर्ण दगडी पुल दुरावस्थेत असून त्यावरून वाहतुक करणा-या दुचाकी, चारचाकी, जनावरे यांना धोका असून आवश्यक उपाययोजना करण्यात यावी, तसेच नदीपात्रातील झाडे, झुडपे, कचरा काढून नदिचे पात्र स्वच्छ करण्यात यावे. 
9) कोरोना कालावधीत कोरानाने मयत अंत्यसंस्कार विधीसाठी निधीतील गैरव्यवहार प्रकरणातील संबधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. 
10)खासबाग-मोमीनपुरा बिंदुसरा नदीवरील नियोजित पुल तात्काळ बांधण्यात यावा. 
11)बीड शहरातील रस्त्याच्या मध्यभागी असणा-या विद्युत रोहीत्र यांची जागा बदलण्यात येऊन भविष्यातील अपघात टाळावेत. 
  

प्रभाग 13 मधील "दोस्ती टी हाऊस ते वडरवाडा" रोड चे रखडलेले काम तात्काळ चालू करा.अन्यथा न. प. कार्यालया समोर धरणे आंदोलन. प्रा पवन मुंडे.


परळी वैजनाथ ( प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग 13 मधील "दोस्ती टी हाऊस ते वडरवाडा" रोड चा  रखडलेला रस्ता फक्त खोदकाम करून बंद ठेवलेला आहे तरी उभा रस्त्याचे काम येत्या 8 दिवसात चालू करावे अन्यथा प्रभागातील नागरिकांना घेऊन न प समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रभागाचे भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी दिला आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या मागणीसाठी त्या परिसरातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधी नी वारंवार पाठपुरावा करून न प प्रशासनाला रस्ता चालू करायला भाग पाडले होते मात्र निगरगट्ट न प प्रशासनाने मोठ्या थाटात कामाचे उद्घाटन सुद्धा केले आणि नंतर काम अर्धवट खोदकाम करून सोडून दिले, तरी येत्या 8 दिवसात ते काम पूर्णपणे चालू करावे अन्यथा नागरिकांना घेऊन न प प्रशासना समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रभागाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी दिला आहे.

Sunday, October 3, 2021

परळी-अंबेजोगाई आकाशवाणी एफ एम केंद्र निर्मितीसाठी अतिरिक्त महासंचालक आकाशवाणी-दुरदर्शन मुंबई यांच्याकडून प्रसारभारतीकडे तातडीने प्रस्ताव दाखल होणार.


*सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे व सहका-यांच्या उपोषणाची दखल.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)राष्ट्रपिता म.गांधी जयंती 2 अॉक्टोंबर 2021 रोजी दुरदर्शन उच्चशक्ती प्रक्षेपण केंद्र पिंपळा(धा.) ता.अंबेजोगाई.येथे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय,भारत सरकारच्या वतीने
 आकाशवाणी एफ एम,लोकल रेडीओ स्टेशन केंद्र सुरू करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे व सहका-यांच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
      सदरील मागणीच्या अनुषंगाने उपोषणस्थळी मुंबई आकाशवाणी-दुरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक श्री.राजेश जैन व कार्यक्रम निर्मिती विभाग प्रमुख श्री.नीरज अग्रवाल यांनी चेतन सौंदळे यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद साधून तातडीने भारत सरकारच्या केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय तसेच प्रसारभारतीकडे आकाशवाणी केंद्र निर्मितीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवून श्री.सदाशिव चाफुले उपसंचालक,दुरदर्शन उच्चशक्ती प्रक्षेपण केंद्र,पिंपळा(धा.)यांना आकाशवाणी केंद्र निर्मिती प्रस्ताव दाखल करण्याच्या सुचना दिल्या.
  उपोषणस्थळी परळी-अंबेजोगाई परीसरातील विविध पक्षांचे नेते,मान्यवर,पत्रकार बांधव व नागरिकांनी भेट देऊन सक्रीय पाठिंबा दिला.यावेळी मनसे पर्यावरण सेनेचे राज्य चिटणीस श्रीकांत पाथरकर,शिवसेनेचे विधानसभा प्रमुख राजाभैय्या पांडे,वैद्यनाथ बँकेचे संचालक नारायण सातपुते,माजी उपनगराध्यक्ष रवीन्द्र परदेशी,शिवसेनेचे नेते भोजराज पालीवाल,अॅड.मनजीत सुगरे,अ.भा.वारकरी मंडळ मराठवाडा विभागिय अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे,मनसे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर,सोमनाथ निलंगे,चंद्रकांत हालगे,उमेश अग्रवाल,संतोष पंचाक्षरी,मकरंद नरवणे,संतोष चौधरी,विशाल अकाते,बाळासाहेब गिरवलकर,मन्मथ नरवणे,अनिल मिसाळ,सतीश चौधरी,नितीन पिंपळे,राजेश कांकरिया,संदीप टाक,प्रकाश कस्तुरे,दयानंद चौधरी,मनोज मानधणे,आत्माराम खंदारकर,रमेश चौधरी सर,महेश घेवारे,विराज धीमधिमे,हारूण शेख,धनंजय गाढवे,सुमीत कलशेट्टे यांच्यासह अनेकांनी उपोषणात सहभाग घेऊन सक्रीय पाठिंबा दिला.
  आकाशवाणी केंद्र निर्मितीसाठी बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे,खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे,नवनिर्वाचित राज्यसभा खासदार रजनीताई पाटील,विधान परिषद आमदार संजयभाऊ दौंड,आमदार नमिताताई मुंदडा यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याची माहिती  नगरसेवक चेतन सौंदळे यांनी दिली आहे.

गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवणा-या जिल्हापरिषद कार्यालयातच शौचालयासाठी पाणी नाही, आंदोलनासाठी बकेटभर पाणी विकत घ्यावे लागले:-डाॅ.गणेश ढवळे


बीड (प्रतिनिधी) बीड जिल्हापरिषद कार्यालय मार्फत मुख्य कार्यकारी आधिकारी अजित पवार जिल्हाभर स्वच्छता अभियान २ऑक्टोबर रोजी राबवत असताना त्यांच्याच कार्यालयात शौचालयासाठी पाणी नसल्यामुळेच दिव्याखाली अंधार म्हणण्याची वेळ आली आहे, महिला कर्मचा-यांना शौचालयासाठी घरी जावे लागते तर पिण्याच्या पाण्याची अडचण असल्याचे कर्मचा-यांने सांगितले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कागदोपत्रीच शौचालय बांधण्यात येऊन गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यास जाणीवपुर्वक विलंब करणा-या जिल्हापरिषद प्रशासनाचा निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य , भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर यांच्या वतीने आज २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त जिल्हापरिषद कार्यालयातील शौचालय सफाई करून निषेध नोंदविण्यात आला. 

सविस्तर माहीतीस्तव:-
__
ग्रामीण भागातील ज्या भागात ऊन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तिव्र पाणीटंचाई आहे, अशा भागात केवळ कागदोपत्रीच शौचालय बांधण्यात आल्याचे दाखवुन आधिकारी व गावपुढा-यांनी शासनाची दिशाभूल करून लाखो रूपयांचा अपहार केला असून जिल्हापरिषद मधिल वरिष्ठ आधिका-यांचे हितसंबंध यात गुंतल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते यांनी पुराव्यासह तक्रार, निवेदन, आंदोलन करून सुद्धा कारवाई करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हापरिषद कार्यालयातील शौचालय सफाई करून निषेध नोंदविण्यात आला.

* पाणीपुरवठा विभागाच्या पथकाचा तपासणीचा फार्स :-डाॅ.गणेश ढवळे 
_____
स्वच्छ भारत मिशन आणि जागतिक बॅकेच्या माध्यमातुन जिल्ह्य़ातील २६५ ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक शौचालय उपक्रम राबविण्यात आला मात्रा दि.२३व २४ जुलै २०२१ रोजी पथकाचे कक्ष आधिकारी स्मिता राणे, राज्य कक्षाचे समन्वयक आशिष थोरात, विभागीय समन्वयक अरूण रसाळ, तसेच बीड उपमुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद स्व. व पाणीपुरवठा काकडे, यांनी संगनमतानेच मौजे कोळवाडी ता.जि.बीड येथील आदर्श ग्रामपंचायत मध्ये कोरोना कालावधीत दींडी आली नसताना वापरात नसलेले शौचालय दींडीतील लोकांनी वापरल्याची खोटी माहीती मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांना देऊन शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक केल्याबद्दल संबधित दोषींवर उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री, ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे. 

विश्वास नागरे पाटील हे महाविकास आघाडीचे माफीया ;- किरीट सोमाय्या.





नवी दिल्ली  :- महाविकास आघाडीच्या  नेत्यांवर आरोपांची राळ उठवून खळबळ उडवून देणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता थेट सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावरच निशाना साधला आहे. विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडीचे माफिया आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

किरीट सोमय्या आज दिल्लीत आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना सोमय्या यांनी हा आरोप केला आहे. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे ठाकरे सरकारचे माफिया म्हणून काम करत आहेत. पाटील यांनी गैरकायदेशीरपणे मला घरात कोंडून ठेवले. सीएसटी स्टेशनच्या बाहेर कोंडून ठेवलं. ते सूचना देत होते. ते सीनियर पोलीस अधिकारी आहेत.

एज्युकेटेड अधिकारी आहेत. परमबीर सिंग 100 कोटींच्या वसुलीत सहभागी झाले. यांचा एसीपी 50 लाखांची सुपारी घेतो. अन् नांगरे-पाटील हे माफिया सारखे वागत आहे, अशी टीका सोमय्या यांनी केली.

*जेष्ठांचे आशिर्वाद हिच शिदोरी...*

परळी वैजनाथ-शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार उर्फ पप्पूअण्णा ठक्कर यांचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांनी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मातोश्री रूक्मीनबाई पंडितअण्णा मुंडे यांचे तसेच माजी नगराध्यक्षा राधाबाई मोहनलालजी बियाणी यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे सर उपस्थित होते. आयुष्यात अनेकांचे आशिर्वाद मला वेळोवेळी मिळत गेले असून त्या सर्वांचेच धन्यवाद. परंतू जेष्ठांचे आशिर्वाद ही माझ्यासाठी पुढील आयुष्याची शिदोरी असून तु लढ ...आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असा आशिर्वाद त्यांच्याकडून मला मिळतो अशी प्रतिक्रिया अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त केली.

शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास आपण कटिबद्ध-अभयकुमार ठक्कर


* श्री ठक्कर यांच्यावर जिल्हाभरातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य सत्कार.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांचा वाढदिवस आज शनिवार दिनांक 2 ऑक्टोबर 2021 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील विविध स्तरातून शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव करण्यात आला. दरम्यान शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने श्री ठक्कर यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

आज शनिवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार उर्फ पप्पूअण्णा ठक्कर यांचा आज वाढदिवस परळी शहर व परिसरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आज  जिल्हाभरातून श्री ठक्कर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मोबाईल फोन, व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर आदी सोशल मिडीया वर तसेच प्रत्यक्ष भेटून कार्यकर्त्यांनी काल रात्री पासूनच शुभेच्छा देण्यास सुरुवात केली होती. 
शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा,  काँग्रेस या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच वकील, डॉक्टर, इंजिनिअर,विविध व्यापारी आदींनी श्री अभयकुमार उर्फ पप्पूअण्णा ठक्कर यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान सत्काराला उत्तर देताना श्री ठक्कर म्हणाले की, विश्व हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचून वीस टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण करणार असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे युवा सेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री ना आदित्यसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून  सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास आपण कटिबद्ध राहू असे ते म्हणाले.
यावेळी विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे,शिवसेना जिल्हा सह संघटक रमेश चौंडे, माजी उप शहर प्रमुख सतीश जगताप, विद्यार्थी सेना जिल्हा उपप्रमुख मोहन परदेशी, उप शहर प्रमुख किशन बुंदेले, माजी शहर संघटक संजय कुकडे विभाग प्रमुख संजय सोमाणे, बबन ढेंबरे, विद्यार्थी सेना तालुका समन्वयक अमित कचरे, शहर प्रमुख गजानन कोकीळ,मनीष जोशी,लक्ष्मण मुंडे, दिपक जोशी, योगेश घेवारे, प्रकाश देवकर, योगेश जाधव, बजरंग औटी,वैभव जगताप, सिद्धार्थ गायकवाड,नवल वर्मा,नवनाथ वरवटकर,नरेश मैड, विनीत वानरे,किरण शिंदे, संस्कार पालीमकर,मयुर जगताप, सोमनाथ गायकवाड, शुभम मोहिते उपस्थित होते.

Friday, October 1, 2021

परळी च्य न प प्रशासनाने किमान स्मशानभूमीचा रस्ता तरी दुरुस्त व दुर्गंधी मुक्त करावा..!


*मृत व्यक्तीला शेवटचा प्रवास तरी सुखाने करू द्या..! प्रा पवन मुंडे.

परळी प्रतिनिधी : शहरात सगळीकडे बहुचर्चित 110 कोटींच्या बोगस गरार योजनेच्या नावा खाली  शहरात सर्वत्र चांगले रस्ते फोडून शहराचे वाटोळे तर केलेच आहे पण एखादा व्यक्ती मृत्यू पावला तर त्याचा अंतिम प्रवास तरी स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था दूर करून  तो प्रवास तरी सुखाने करू द्या अशी मागणी भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.
    शहरात स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच-पाणी साचले असून , तेथील पाण्याचा हौदात ले पाणी रोडवर आल्याने नागरिकांना तेथून जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे, या पाण्यातून अंत्यविधी साठी जाणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करत स्मशानभूमीत पोचावे लागत आहे, या मुळे एखाद्या मयत व्यक्तीचा अंत्यसंस्कार सुद्धा नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे व्यवस्थित नागरिक करू शकत नसून शहरातील मयत व्यक्तीला त्याचा शेवटचा प्रवास तरी सुखाने करू द्या अशी खरमरीत टीका नगरसेवक प्रा मुंडे यांनी केली आहे