परळी वैजनाथ ( प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग 13 मधील "दोस्ती टी हाऊस ते वडरवाडा" रोड चा रखडलेला रस्ता फक्त खोदकाम करून बंद ठेवलेला आहे तरी उभा रस्त्याचे काम येत्या 8 दिवसात चालू करावे अन्यथा प्रभागातील नागरिकांना घेऊन न प समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रभागाचे भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी दिला आहे.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या मागणीसाठी त्या परिसरातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधी नी वारंवार पाठपुरावा करून न प प्रशासनाला रस्ता चालू करायला भाग पाडले होते मात्र निगरगट्ट न प प्रशासनाने मोठ्या थाटात कामाचे उद्घाटन सुद्धा केले आणि नंतर काम अर्धवट खोदकाम करून सोडून दिले, तरी येत्या 8 दिवसात ते काम पूर्णपणे चालू करावे अन्यथा नागरिकांना घेऊन न प प्रशासना समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रभागाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment