रेल्वेच्या चुकीच्या व्यवस्थानामुळे प्रवाशांना आर्थिक ताण.
गेल्या १५-२० दिवसापासून
परळी-परभणी दरम्यान अपडाऊन
गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांना
प्रचंड त्रास होत आहे तर दैनंदिन
प्रवास करणारांना अनावश्यक
आर्थिक ताण पडत आहे. यामुळे
रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या
प्रवाशांत संतापाची लाट निर्माण
झाली आहे.
यासंबंधी अधिक माहिती अशी
की, परभणी ते पूर्णा या दरम्यान रेल्वे
रूळांचे रूंदीकरन सिळालीगच्या
कामासंबंधी गेल्या १५-२०
दिवसापासून मेगा ब्लॉकमुळे
परभणी ते परळी दरम्यानच्या
बहुतांश गाड्या रद्द करण्यात आल्या
आहेत. त्यामुळे परळीहन
परभणी जाणाऱ्या नोकरदारांना
व्यावसायिक प्रवाशांना रेल्वे सोडून
पर्यायी वाहनाची मदत घ्यावी
लागत आहे. एस.टी.बसेस अॅटो
रिक्षा, जीप आदी वाहनातून प्रवास
करावा लागत आहे. रस्ते खराब
झाल्यामुळे प्रवासात शारिरीक त्रास
होत असून जादा आर्थिक ताण
पडत आहे. मेगब्लॉक च्या
नावाखाली रेल्वे गाड्या रद्द
केल्यामुळे दैनंदिन प्रवाशांनी
काढलेले मासिक पास गाड्या
झाल्यामुळे पास वाया जात आहे
तर पर्यायी वाहनाने प्रवास केला
तर जादा पैसे लागत आहेत.
समजलेल्या माहितीनुसार १५
फेब्रुवारी पासून मेगाब्लॉकची मुदत
वाढवली जाणार असून अजून
किती दिवस प्रवाशांना रेल्वेचा
त्रास सहन करावा लागणार आहे
? अशी चर्चा रेल्वे प्रवासात
ऐकावयास मिळत आहे.
No comments:
Post a Comment