Monday, February 3, 2020

सभापती साहेब. पाण्याचा अपव्यय करू नका ! शहरातुन राखेची वाहतुक बंद करा.


परळी वै…..
परळी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या वतिने गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहर स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून प्रगती पथावर स्वच्छताचे काम होत आहे. शहर स्वच्छ ही होतय स्वच्छता विभाग आणी सभापतीच कौतुक ही नागरिकातुन होतय.परंतु शहरातील मुख्य रस्त्यावर धुळ उडु नाही म्हणुन टॕंकरद्वारे पाणी सांडताय हे काही बरोबर नाही कारण गेली दोनवर्ष पाण्यानी व्याकुळ झालेली परळी आपण पाहतो आहोत. हा काय पर्याय नाही पाणी रस्त्यावर सांडणे पाण्याच महत्व जाणुन घ्याल आणी धुळीसाठी अन्य पर्याय अमलात आणाल अशी अपेक्षा नागरिकांच्या वतिने व्यक्त होत आहे.
राखेच्या टिप्परच्या वाहतुकींने परळी शहरात प्रमुख रस्त्यावर दररोज राख सांडुन धुळीचे प्रदुषण दैनंदिन वाढतच चालले आहे. यामुळे माॕर्निग वाॕक असो दिवसभर शहरात वावरणे नागरिकांना ञास दायक झाले आहे.
स्वच्छतासाठी घेतलेली आघाडी वाकाण्याजोगी आहे परंतु शहरात धुळ किंवा राख सांडणारच नाही याकडे अधिक लक्ष दिले तर बरे होईल. त्यासाठी राखेची वाहतुक शहरातुन बंद करुन शहराच्या बाहेरुन कशी करता येईल.राख वाहतुक करताना टिप्पर किंवा टॕंकरवर मजबुत अच्छादनासाठीचे बंधन लावणे किंवा इतर पर्यायी बंधने लावुन होणारे राखेचे प्रदुषण टाळता येईल आणी रोडवर पाणी सांडणे ही पर्यायाने बंद करता येईल.न.पच्या स्वच्छता विभागाच्या माध्यमातून परळीकर प्रदुषण मुक्त किंवा स्वच्छ श्वास घेतील अशी भावना परळीकर नागरिक व्यक्त करत आहेत.

No comments:

Post a Comment