बीड (प्रतिनिधी) - लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे, व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड आणि प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.प्राथमिक शाळा पोलीस काॅलनी बीड येथे मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मैना बोराडे माजी उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बीड. तसेच प्रमुख अतिथी म्हणून बीड नगरपालिकेच्या माजी सभापती तथा नगरसेविका जयश्री विलास विधाते शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र खेडकर, केंद्र प्रमुख लक्ष्मीकांत अवढाळ, पंचायत समिती बीड उषा लोंढे, एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागापुरे, राखीव दलाचे. पो. निरीक्षक पोलीस मुख्यालय बीड पी.पी.दलाई,संतोष जायभाय,दै.वादळवार्ताचे कार्यकारी संपादक बालाजी जगतकर, सुजाता सावंत,दैनिक दिव्यलोक भूमीचे केशव मुंडे, न्यू 23 मराठीचे संपादक गणेश शिंदे,संपादक युवादर्पण लाईव्हचे राजेंद्र तिडके, संतोष जायभाय,सविता जैन,रवि धोंडगे मुख्याध्यापक सुमित जोगदंड, कार्यक्रमाच्या आयोजक समाजसेविका सीमा ओस्तवाल यांची उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात खवचट सर यांनी केले तर शाळा आणि सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आजवर राबवण्यात आलेल्या उपक्रमांचा ओघवता आढावा घेतला. तर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माजी सभापती तथा नगरसेविका जयश्री विलास विधाते यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत पौराणिक काळ ते स्वातंत्र्यपूर्व काळात स्पृश्य अस्पृश्यतेच्या जोखडात अडकलेला एकलव्याला धनुर्विद्या नाकारणारा गुरु द्रोणाचार्य तर स्वातंत्र्यपूर्व काळात स्पृश्य अस्पृश्यतेची जाणीव करुन देत छडी फेकुन मारणारा शिक्षक ते आज प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळवून देण्यासाठी तांडा वाडी वस्ती झोपडपट्टी ते गाव कुसाबाहेर शाळा प्रवेशासाठी उपेक्षित वंचीत दीन दुबळ्याच्या लेकरांना प्रेरित करणारा जि.प.चा आजचा शिक्षक हे परिवर्तन म्हणजे " जग बदल घालून घाव, सांगून गेले मज भीमराव." या आण्णाभाऊंच्या लेखणीची ताकद आहे. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या आयोजक समाजसेविका सीमा ओस्तवाल यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांना बोलक केल. मोबाईल पासुन दुर रहा, चांगला अभ्यास करा. आणि मोठे व्हा.आपली ओळख आपल्या कामाच्या माध्यमातून झाली पाहिजे असे काम करा अशा शुभेच्छा दिल्या. उषा लोंढे यांनी प्रत्येक शाळेत महापुरुषांचे फोटो असायला पाहिजेत त्याच बरोबर प्रत्येक महापुरुषाची जयंती साजरी केली पाहीजे. त्यांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांना उलगडून सांगीतले पाहिजे अशी आपेक्षा व्यक्त केली. मैना बोराडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शाळेला ई-क्लास रुम मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमात कें.प्रा. शाळा पोलीस काॅलनी, कें. प्रा.शाळा इंदिरानगर, कें. प्रा. शाळा धोंडीपुरा. कें. प्रा. शाळा शाहुनगर बीड या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल,ईरेझर,शार्पनर अशा शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यी बालमित्र मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
No comments:
Post a Comment