परळी वैजनाथनाथ (प्रतिनिधी) शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय परळी वैजनाथ येथे प्राचार्य.अतुल दुबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
15 ऑगस्ट 2025 दिन हा भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून याच अनुषंगाने भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा म्हणजे घर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत दिनांक 13, 14 व 15 ऑगस्ट रोजी नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य.अतुल दुबे यांच्या हस्ते करून 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रा.ए.ए. मुंडे मॅडम,प्रा.यु.एन.फड,प्रा.एस.आर.कापसे,प्रा.पी.पी.तिडके मॅडम,प्रा.के.एच.जायभाये, प्रा.डि.व्ही.उंबरे मॅडम, प्रा.ए.एन.खाकरे, प्रा.ए.डी.शेख ,प्रा.एस.के.अपार मॅडम एस.बी.अष्टेकर, व्ही.एन.शिंदे,जी. व्ही.कांबळे , यु.बी.जगताप,ए.बी.जगतकर यांच्या सह प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment