परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळीकरां साठी अभिमानाची बातमी! शहरातील सुप्रसिद्ध पेढा विक्रेते विशाल बुद्रे यांचा सुपुत्र सोहम विशाल बुद्रे याने वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. मुंबईतील नामांकित एच. बी. टी. कूपर मेडिकल कॉलेज, जुहू येथे त्याचा एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित झाला असून या यशामुळे परळीकरांचा अभिमान उंचावला आहे.
लहानपणापासून अभ्यासू वृत्तीचा असलेला सोहम याने कठोर परिश्रम, चिकाटी आणि ध्येयवादी प्रयत्नांच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परळी शहरात आनंद व्यक्त केला जात असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सोहम बुद्रे याचे प्राथमिक शिक्षण चंपावती विद्यालय बीड येथे झाले. त्यानंतर त्याने अकरावीपर्यंत माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालयात व बारावीचे शिक्षण के एस के महाविद्यालयात पूर्ण केले. शैक्षणिक जीवनात सतत उत्कृष्टता राखणारा सोहम हा लहानपणापासूनच अभ्यासात अगदी हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. सोहम विशाल बुद्रेच्या या यशामुळे त्याचे कुटुंब, नातेवाईक तसेच परळी शहरभरातून कौतुकाची दाद दिली जात आहे.
No comments:
Post a Comment