*एकापेक्षाएक नाट्यांचा रसिकांनी आनंद घ्यावा - बिभीषण चवरे
बीड ( प्रतिनिधी ) :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून ६१ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दि. 28 नोव्हेंबर ते ६ डीसेंबर या कालावधीत सायंकाळी ७ या वेळेत पार पडणार आहेत. या स्पर्धेचे उदघाटन अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. दीपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. केशव भागवत, नाट्यकलावंत प्रवीण वडमारे, दैनिक पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक सुनिल डोंगरे, दिगदर्शक सचिन सोनवणे, कलावंत जतिन वाघमारे, स्पर्धेचे समन्वय
मुकूंद धुताडमल आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांच्या नियोजनात्मक भूमिकेतून ६१ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा पार पडत आहे. त्या अनुषंगाणे बीड हे औरंगाबाद केंद्राचे उपकेंद्र असून या केंद्रावर नऊ नाटके सादर होणार आहेत.सोमवारी या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे उदघाटन पार पडले. या स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रकाश खोत, मीनाक्षी केंदे, प्रकाश सप्रे काम पाहणार आहेत. बीड जिल्ह्यातील रसिकांनी या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन उदघाटनावेळी मान्यवरांनी केले आहे. ही राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड केंद्र समन्वयक मुकूंद धुताडम, प्रविण निसर्गंध, प्रवीण राठोड, अक्षय कोकाटे, दिनेश पाटोळे, ऋषिकेश दाभाडे आदी परिश्रम घेत आहेत.
अशी होणार सादर नाटके
मुळाच्या तळाशी,दोन स्पेशल, अजूनही उजाडत नाही, बिहाईन्ड दी कर्टन, गोदो वन्स अगेन, अनाघ्रात, टेक अ चान्स, ही सर्व नाटके यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे रोज सायंकाळी सात वाजता होणार आहेत. या नाटकांचा बीडच्या रसिकांनी अधिकाधिक आस्वाद घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment