Friday, November 25, 2022

भांडणाचा राग मनात ठेवत 4 वर्षीय चिमुकल्याची हत्या.



नाशिक - (प्रतिनिधी) त्र्यम्बकेश्वर मधील आधारतीर्थ आश्रमात 4 वर्षीय मुलाचा संदेहास्पद अवस्थेत मृतदेह मिळाला होता, पोलिसांच्या प्राथमिक अहवालात 4 वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळून खून करण्यात आला होता अशी धक्कादायक बाब उघडकीस आली होती.
राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले आधारतीर्थ आश्रमात राहतात, साधारण दीड ते 17 वर्षे वयोगटातील असे एकूण 130 मुले त्याठिकाणी आहे. 
4 वर्षीय मृतक आलोक विशाल शिंगारे हा आपल्या मोठया भावासोबत आश्रमात राहत होता.
पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास केला असता मृतक आलोक च्या भावाचे एका 16 वर्षीय मुलांसोबत भांडण झाले होते, भांडणाचा राग मनात ठेवत त्या अल्पवयीन मुलाने 4 वर्षीय आलोक चा गळा आवळला. 
पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सदर कृत्याची कबुली दिली. 

No comments:

Post a Comment