*वंचित बहुजन आघाडी मोकाट जनावरे नगरपालिकेत आणून कोंडणार - लखन जोगदंड.
बीड (प्रतिनिधी) सध्या बीड शहरामध्ये मोकाट जनावरांची रस्त्यावरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही मोकाट जनावरे बीड शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गावर व शहरातील कुठल्याही रस्त्यावर मध्यभागी बसत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे यामुळे मोकाट जनावरांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे शाळकरी विद्यार्थी महिला पुरुष यांना व वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे पूर्वी प्रत्येक नगरपालिकेकडे जनावरे पकडून ठेवायची पद्धत होती परंतु बीड नगरपालिकेचा कोंडवाडा सध्या अस्तित्वात नाही असे चित्र दिसते त्यामुळे ही मोकाट जनावरे नगरपरिषेक पकडून एका कुठल्याही अनुदानित गोशाळेत पाठवावीत जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल यामुळे ट्रॅफिक जाम व अपघाताचे प्रमाण वाढले आहे या प्रकरणी तात्काळ पावले उचलून योग्य ती कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी शहराच्यावतीने रस्त्यावरील मोकाट जनावरे नगरपालिकेच्या प्रांगणात आणून सोडली जातील व अशा स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी निवेदनातून माहिती नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली आहे होणाऱ्या परिणामास नगरपालिका जबाबदारी असे या देण्यात म्हटला आहे यावेळी सिस्टमंडळात वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते ज्ञानेश्वर कवठेकर, पुरुषोत्तम वीर, अनुरथ वीर, उमेश तुळवे मिलिंद सरपते व शहर अध्यक्ष लखन काका जोगदंड सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment