Wednesday, November 23, 2022

जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील धक्कादायक प्रकार.शाळेचे मुख्याध्यापक चक्क मद्यधुंद अवस्थेत.

अमरावती (प्रतिनिधी) मेळघाटातील काटकुंभ जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय, येथे शाळेतील वर्गखोलीत शाळेचे मुख्याध्यापक चक्क मद्यधुंद अवस्थेत झोपलेले आढळून आले आहे. अविनाश राजनकर असे मख्याध्यापकाचे नाव असून त्यांच्यावर कारवाईसाठी जिल्हापरिषद सीईओ यांच्याकडे तक्रार केली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक मद्यधुंद असल्याची तेथील नागरिकांना मिळाली तेव्हा त्यांचा मोबाईलवर व्हिडिओ काढण्यात आला आणि तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

No comments:

Post a Comment