खाजगी ट्रॅव्हल बसमधून अवैधपणे गुटखा पान मसाला त्याचबरोबर नशेच्या वस्तू वाहतूक केली जात असल्याची घटना पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरामध्ये खाजगी ट्रॅव्हल्समधून गुटख्याची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती.
१७ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता त्या दरम्यान संबंधित माहिती मिळालेली ट्रॅव्हल्स पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तात्काळ ट्रॅव्हल्स बस अडवून तपासणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व पानमसाला पोलिसांना तपासा दरम्यान आढळून आला. या कारवाईदरम्यान जवळपास 17 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून ट्रॅव्हल्स चालक व वाहकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
No comments:
Post a Comment