* अशोक हिंगे यांच्या समवेत पालकांचे शिष्टमंडळ कलेक्टर यांना भेटले.
बीड (कांतीकारी साथी न्युज ) वंचित बहुजन आघाडी बीड च्या वतीने जिल्ह्यातील सर्व ईंग्रजी माध्यमांच्या शाळेत विद्यार्थ्यांना 50 टक्के म्हणजेच अर्धी फीस माफी द्यावी अशोक हिंगे. मागच्या वर्षी आणि याही वर्षी आॅन लाईन शिकवले जात आहे. तरी पण या शाळेचे व्वस्थापण मंडळ पुर्ण फिसची मागणी करीत आहे. जे पालक फीस भरत नाहित त्यांच्या पाल्यांना आॅन लाईन ग्रुप मधुन काढुन टाकले जात आहे त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहाणार आहेत. कोरोनाच्या काळात लाॅक डाऊन असल्याने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक छोटे व्यवसायिक व्यापारी कामगार शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे ते पालकआपल्या पाल्यांची भरमसाठ फीस भरु शकत नाहीत म्हणुन सन 2020-2021 व सन 2021-2022 या दोन वर्षांच्या फिस मध्ये 50 टक्के सवलत संस्थाचालकांनी द्यावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढावेत या मागणीसाठी साठी आज पालका सोबत जिल्हाधिकारी बीड यांची भेट घेतली. जो पर्यंत असा निर्णय होत नाही तो पर्यंत पालकांनी कुठल्याही प्रकारची फीस भरू नये शालेय पुस्तके खरेदी करू नयेत प्रवेश घेवु नयेत असा निर्णय पालकांच्या बैठकीत माझ्या उपस्थितीत घेण्यात आला. या प्रसंगी पालक समितीचे प्रदीप धांडे, नगर सेवक रमेश चव्हाण शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील सुरवसे आर.टी. ई. कार्यकर्ते मनोज जाधव आदि सह असंख्य पालकाचे शिष्ठमंडळ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment