* राज्यव्यापी "चक्का जाम" आंदोलनाची ठरविणार रणनिती !
पुणे - (कांतीकारी साथी न्युज)
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी भाजपच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात २६ जून रोजी चक्का जाम आंदोलन
करण्यात येणार आहे. आंदोलनाची रणनिती ठरविण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हया उद्या रविवारी (ता. २०) पुणे दौर्यावर असून त्यांच्या उपस्थितीत उद्या पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात भाजपच्या वतीने येत्या २६ जून रोजी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ओबीसी नेते वेगवेगळ्या जिल्हयाचा दौरा करत असून त्यानुसार भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हया उद्या २० तारखेला पुण्याच्या दौर्यावर येत आहेत. उद्या त्यांच्या उपस्थितीत पुणे व पिंपरी चिंचवड येथे भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. पुणे शहर जिल्हयाची बैठक उद्या सकाळी ११.३० वा. भारतमाता अभ्यासिका पर्वती येथे तर दुपारी ४ वा. पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवडची संयुक्त बैठक हाॅटेल कलासागर, कासारवाडी येथे होणार आहे.या बैठकीस जिल्हा पदाधिकारी, आमदार-खासदार (सर्व लोकप्रतिनिधी), जिल्हा व मंडलाचे अध्यक्ष तसेच ओबीसी मोर्चाचे प्रदेश , जिल्हा व मंडलाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकी दरम्यान पंकजाताई मुंडे ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची देखील भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
•••
No comments:
Post a Comment