मुंबई (प्रतिनीधी ) भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसायट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. सातारा, पुणे आणि रत्नागिरीला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग , रायगड आणि पालघरला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. औरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूरला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राला ऑरेंज अॅलर्ट
पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांमध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये विविध ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
19 आणि 20 जूनला महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात रेड किंवा ऑरेंज अॅलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment