परळी वैजनाथ : ( कांतीकारी साथी न्युज) पाहिल्याच पावसात परळी शहरात स्वछतेचे तीन-तेरा वाजले असुन जागोजागी नाल्या कोंडून पडल्या मुळे नाल्यांचे पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरात गेले आहे तरी निगरगट्ट नगरपालिका प्रधासनाने दोन दिवसात स्वच्छता मोहीम हाती घेतली नाही तर रस्त्यावर येऊन आंदोलन करु असा इशारा भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी दिला आहे.
शहरात पहिल्याच अगदी छोट्याशा पावसात अस्वच्छते मुळे गल्लो-गल्लीतील नाल्या तुंबल्या मुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात गेले आहे आहे,वारंवार सूचना देऊन पण निगरगट्ट नगरपालिका प्रशासन स्वछतेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नागरिक परेशान झाले असून गल्लोगल्ली नाल्या तुंबून लोकांच्या घरात पाणी गेले असून,शहरात स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले असून शहरातील सर्वच भागात नाल्या तुंबल्या असल्याने पावसाचे पाणी लोकांच्या घरात घुसले असून शहरात या मुळे रोगराई निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,तरी निगरगट्ट नगरपालिका प्रशासनाने वेळीच दखल घेऊन शहरातील स्वच्छता व तुंबलेल्या नाल्यांचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केला आहे
* नगराध्यक्षा दाखवा व बक्षीस मिळवा...!!
परळी शहराने जनतेतून झालेल्या निवडणुकीत मोठ्या मनाने आणि मोठ्या अपेक्षेने नगराध्यक्ष म्हणून मा सरोजिनी ताई हालगे यांना निवडून दिले मात्र नगराध्यक्ष जनतेच्या कोणत्याही सामाजिक प्रश्नात दिसून येत नाहीत,जनतेच्या अडी-अडचणीत शहराचा प्रथम नागरिक या नात्याने अध्यक्षांनी एक पालक म्हणून उभे राहणे अपेक्षित आहे मात्र नगराध्यक्ष कुठेच दिसत नाहीत एवढेच नाही तर परळी शहराचा नगराध्यक्ष कोण ? हे सुद्धा सामान्य लोकं विसरून जायची वेळ आली आहे आणि नगराध्यक्ष दाखवा व बक्षिस मिळवा असे म्हणायची वेळ जनतेवर आली आहे असा आरोप नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment