Thursday, June 3, 2021

चाळीस हजार मागणाऱ्या सपोनि गव्हाणकर च निलंबन !



चाळीस हजार मागणाऱ्या सपोनि गव्हाणकर च निलंबन !

बीड (प्रतिनीधी) बेपत्ता असलेल्या मुलीच्या वडिलांकडे चाळीस हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दिंडरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर याला पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांनी निलंबित केले आहे .

माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथील 17 वर्षीय मुलगी आठ दहा दिवसापासून बेपत्ता असल्याने तिच्या वडिलांनी मुलीच्या शोधासाठी दिंडरूड पोलिसात धाव घेतली होती .त्यावेळी सपोनि गव्हाणकर यांनी एका मध्यस्था मार्फत चाळीस हजार रुपयांची मागणी केली होती .

याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती,त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या मुलीला शोधून काढत पोलिसांनी आरोपीला अटक केली होती .दरम्यान चाळीस हजार रुपये मागणाऱ्या सपोनि गव्हाणकर याला निलंबित करण्याचे आदेश एसपी आर रामस्वामी यांनी दिले आहेत .

No comments:

Post a Comment