परळी वैजनाथ ( कांतीकारी साथी न्युज)-परळी शहरात वाढत्या अवैध धंद्यामुळे या गुंडाची गुंडगिरी वाढली आहे.यामुळे सामान्य नागरिक वैतागले आहेत. याबाबतीत पोलिसांची दहशत राहिली नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे कालच्या घटनेने सामान्य नागरिकाला त्रास झाला असून यात जनसामान्यांचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल सामान्य नागरिकांनी केला आहे.
परळी शहरातील तुळजाई नगर, कृष्णा नगर, गणेशपार आदी भागात घरासमोर लावलेल्या गाड्यांची शनिवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी नासधूस केली आहे. गाड्यांच्या काचा फोडून लाखो रुपयांचे नुकसान करुन विशेष म्हणजे रस्त्याने जाणारे येणाऱ्या सामान्य नागरिकांनाही मारहाण करण्यात आली आहे
या अज्ञात गुंडांनी मोटार सायकलवरून रॉडने आणि दगड – विटांनी वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. मुळात या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी कोणीही नागरिक समोर येत नाहीत. उलट झालेले नुकसान सहन करत नागरिक गप्प बसले आहेत.
पोलिसांच्या कारकिर्दीवर या घटनेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वरिष्ठांनी याबाबत लक्ष देऊन परळीतील वाढते अवैद्य धंदे व गुन्हेगारी वेळीच रोखणे गरजेचे झाले असल्याचे चर्चा सध्या सुरू आहे.
No comments:
Post a Comment