Friday, June 11, 2021

पुराने वाहुन गेलेला कन्हेरवाडी येथील पुल दुरूस्त परळी ते अंबाजोगाई वाहतूक पूर्ववत.

 
(कांतीकारी साथी न्युज ) परळी ते अंबाजोगाई दरम्यान असलेला कन्हेरवाडी येथील पूल पुराने वाहून गेल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या मार्गाने जिल्ह्यांतर्गत आणि इतर जिल्ह्यातील वाहनांची मोठी वाहतूक होते. या घटनेची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली.  कन्हेरवाडी येथील पूलाची दुरुस्ती करून काल दि १० जून रोजी वाहतूक सुरू करण्यात आली आहे असे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment