Sunday, June 21, 2020

र.भ.अट्टल महाविद्यालयात ऑनलाईन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.


गेवराई प्रतिनिधी -:२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र.भ.अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि क्रीडा विभाग यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ‘फेसबुक लाईव्ह योगा’ दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नियमांचे पालन करून प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पतंजली योग समितीचे अध्यक्ष योगशिक्षक प्रा. राजेंद्र बरकसे यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे योग्य पद्धतीने पालन करून लाईव्ह योगा सादर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. टी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यापीठ स्तरावरील सर्व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवकांनी लाईव्ह योगामध्ये सहभाग नोंदविला. र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या फेसबुक पेजवरून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सकाळी ५:४५ वाजता कार्यक्रमाधिकारी डॉ. समाधान इंगळे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. लाईव्ह होणाऱ्या या उपक्रमात मोठ्या संख्येने योग प्रेमी जनतेने सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजना बीड जिल्हा समन्वयक डॉ. सोपान सुरवसे, उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. सचिन पगारे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. रेवणनाथ काळे, डॉ.सुदर्शना बढे, आय क्यू ए सी समन्वयक डॉ.प्रशांत पांगरीकर, प्रबंधक बी.बी.पिंपळे, कार्यालय अधीक्षक भागवत गवंडी,सुदर्शन निकम यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी झाले होते. तसेच विविध ठिकाणाहून फेसबूक यूजर्सनी हा योगा उपक्रम अनुभवला आणि प्रतिक्रिया दिल्या. योग प्रचारक प्रशांत कुलकर्णी यांनी सूर्यनमस्कार व नवली क्रिया प्रात्यक्षिक सादर केले.स्वयंसेवक रोहन पंडित ह्याने संपूर्ण योगा कार्यक्रमाचे फेसबूक लाईव्ह केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत स्वाभिमान ट्रस्टचे गेवराई प्रभारी डॉ. मुरलीधर मोटे, जेष्ठ योग शिक्षक भीमजीभाई पटेल, राम जिजा चाळक, अशोक गायकवाड, एन.सी.सी. ऑफिसर एस.पी. सूर्यवंशी, पी.डी. घोडके, प्रा. रामलिंग गुळवे, नितीन कुलथे, प्रकाश मुळे, श्रीराम आरगडे, सिध्देश्वर मस्के, कैलास चौधरी,पारेकर, वशिष्ठ उढाण, दीपक जगदाळे, नारायण वारुळे, मधूभाऊ भुसे, सोनी, कानगुडे सखाराम यांच्यासह योग साधकांनी सहका

No comments:

Post a Comment