बीड, दि. 22: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरूंगातील गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या उच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीनेबीड जिल्हा कारागृहात बंदीस्त असलेले 274 आरोपींना 45 दिवसांच्या तात्पुरत्या जामीनावर सोडण्याचा घेतलेल्या निर्णय घेतला यासाठी मोफत वकील जिल्हा विधीसेवा प्राधिकरण,बीडच्या मार्फत देण्यात आला. मा.प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री.हेमंत शं.महाजन यांच्यामार्गदर्शनाखाली जिल्हा पातळीवर समिती स्थापन करून त्यांचे अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्यात आले व 43 आरोपींना तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला.
सर्वच कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त बंदीवान आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर व अन्य आवश्यक उपाययोजना करणे कठीण होत होते. तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उच्च न्यायालयाने समिती स्थापन करून गंभीर गुन्हे वगळता इतर आरोपींना तात्पुरता जामीन देण्याच्या अनुषंगाने सूचित केले होते. त्या अनुषंगाने जवळपास 274 आरोपींचे जामीन अर्ज जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाने अर्ज मागवून ते संबंधीत न्यायालयात दाखल करण्यात आले. व 43 आरोपींना तात्पुरत्या जामीनावर सोडण्यात आले आहे. या कामी वकील वर्ग,तुरूंगाधिकारी व न्यायाधीश वर्ग जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले अशी माहिती प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्री.शरद जी.देशपांडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे
No comments:
Post a Comment