Saturday, June 20, 2020

बीड प्रशासनाचा अजब कारभार तहसीलदारांकडे जिल्हा पुरवठा अधिकार्‍याचा पदभार.

बीड :- (प्रतिनीधी ) सेना-भाजप युती सरकारच्या काळात जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र.1 यांच्या कार्यकारी अभियंतापदी चक्क एका शाखा  अभियंत्याची नियुक्ती केली होती. हे प्रकरण राज्यात प्रशासनात अधिकरित्या गाजले असतांनाच काल प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आघाव यांच्याकडील पुरवठा अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार काढून तो पदभार तहसीलदार सचिन खाडे यांच्याकडे दिला आहे. बीडच्या प्रशासनात उपजिल्हाधिकारी असतांना एका तहसीलदाराकडे जिल्हा पुरवठा अधिकार्‍याचा पदभार कसा काय दिला जातो? याबाबत जिल्हा प्रशासनात खमंगपणे चर्चा चालू आहे. इतकेच काय हे तहसीलदार खाडे अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरलेले आहेत आणि अशा वादग्रस्त तहसीलदाराकडे कर्तव्य कठोर जिल्हाधिकारी रेखावार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी पदाचा पदभार दिलाच कसा? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 
तहसीलदार सचिन खाडे यांना बीड येथे पोस्टींग भेटल्यापासून राजकीय पाठबळ आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्याकडे बीड तहसीलदार या पदाचा अतिरीक्त पदभार सोपवला होता. या अतिरीक्त पदभाराच्या काळात धाडस करत खाडे यांनी जप्त केलेल वाळू प्रकरण, संजय गांधी निराधार लाभार्थ्याच्या पगारी याबाबत केलेल्या बेकायदेशीर कामाची चर्चा जिल्हाभर झाली होती. इतकेच काय रोजगार हमी योजनेच्या कामाच्या फाईलवरही राजकीय दबाव येताच आणि राजकीय भाषेत सुनवल्यानंतर मी कोणत्याही परिस्थितीमध्ये सही करणार नाही अशा सूर असणार्‍या तहसीलदार खाडे यांनी लागलीच सही केली. हे खाडे यांचे तीनही प्रकरण चर्चेेत आल्यानंतर तात्काळ त्यांच्याकडील बीड तहसीलदार पदाचा पदभार काढून घेण्यात आला होता. असे असतांनाच केवळ राजकीय शिक्का बसल्यामुळे उपजिल्हाधिकारी आघाव यांच्याकडील जिल्हा पुरवठा अधिकारी या पदाचा अतिरीक्त पदभार काल रात्री काढून घेण्यात आला. तो पदभार कोणत्याही एका उपजिल्हाधिकार्‍यांकडे  हा पदभार जिल्हा धिकार्‍यांना देता आला असता. रेखावार हे बीडला जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाल्या पासून त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे जन माणसात लोकप्रिय झाले होते.  असे असतांना काल मात्र प्रशासनात जिल्हा पुरवठा अधिकारी या पदाचा पदभार उपजिल्हाधिकारी ऐवजी चक्क एका तहसीलदाराकडे देवून नेमके काय साध्य केले हा प्रश्‍न निर्माण होत असतांनाच खाडे यांच्याकडे कोणत्या राजकीय दबावापोटी देण्यात आला? याची चर्चा प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी दबक्या आवाजात करत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये राजकारणाच्या बाबतीत जसे काहीही होवू शकते तसे आता बीड जिल्ह्याच्या प्रशासनात काहीही होवू शकते. कोणत्याही कनिष्ठ अधिकार्‍याकडे राजकीय पाठबळ असेल तर मोठी आणि मलाईचे पद सहज मिळू शकते अशी चर्चा दुसर्‍या बाजूने होत आहे.

No comments:

Post a Comment