Sunday, June 21, 2020

महाराष्ट्र सायबर विभागाचे नागरिकांना आवाहन. zoom app वापरताना सावध राहा .


मुंबई – सध्या काळात बरेच नागरिक Work From Home करत आहेत. ऑनलाईन मिटींग्ज करिता वापरायला सोपे असल्याने zoom या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे.सायबर भामट्यांनी zoom app सदृश्य काही malware व फेक अँप्स बनवली आहेत. त्यामुळे हे ॲप वापरताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे.असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे. आपल्या सहकाऱ्यां बरोबरच्या ऑनलाईन मिटींग्ज करिता zoom, microsoft meetings, skype , cisco webex इत्यादी सॉफ्टवेअरस/ apps वापरली जात आहेत. zoom त्यामध्ये वापरायला सोपे असल्याने  या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे.

No comments:

Post a Comment