Tuesday, June 23, 2020

पिक कर्जाचे अर्ज त्रुटीच्या नावाखाली नाकारु नये बॕकांना सक्तीच्या सुचना-जिल्हाधिकारी राहुल रेखावार .


बीड (प्रतिनीधी )ः- कोरोनामुळे यंदा पिककर्ज वाटपास अडथळा निर्माण होत आहे. आतापर्यंत 10 ते 12 टक्के इतकेच कर्जाचे वाटप झाले आहे. बँक प्रशासन शेतकर्‍यांची अडवणूक करत असल्याने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बँकांना सक्तीच्या सुचना बजावल्या आहेत. सातबार, आठ अ, फेरफार अशा त्रुटीच्या नावाखाली शेतकर्‍यांचे पिककर्जाचे अर्ज नाकारु नये असे आदेश बजावले आहे. पिक कर्जासाठी शेतकरी विविध बँकांमध्ये ठाण मांडून असतात. जिल्हाधिकार्‍यंाच्या या आदेशामुळे शेतकर्‍यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
सध्या खरीप हंगाम सुरू आहे. पिक कर्ज काढण्यासाठी शेतकरी राष्ट्रीयकृत बँकेसह जिल्हा बँकेत ठाण मांडून असतात. कोरोनामुळे पिक कर्ज वाटपास अडथळे निर्माण हेात आहे. पिक कर्जाच्या टार्गेट नुसार आतापर्यंत दहा ते बारा टक्के इतकेच कर्जाचे वाटप झाले आहेत. त्यातच कागदपत्रासाठी अडचणी निर्माण होवू लागल्या. कागदपत्र पुर्ण नसल्यास बँका पिक कर्जाचे अर्ज नाकारु लागले. त्यामुळे शेतकर्‍यांना विविध संकटाला तोंड द्यावे लागते. कालच कृषी मंत्री दादाजी भिसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकार्‍यांची आढावा बैठक घेवून काही सुचना दिल्या आहेत. सातबारा, आठ अ किंवा फेरफार अशा त्रुटीच्या नावाखाली पिक कर्जाचे अर्ज बँकांनी नाकारु नयेत असे अर्जाच्या बाबतीत सदर कागदपत्रे तहसिल कार्यालयातून मिळवावी व तहसिल कार्यालयाकडून योग्य ती माहीती मिळाल्यानंतरच अर्जामध्ये पुढील नियमावली निरुप कार्यवाही करावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी बँकांना दिले आहे.

No comments:

Post a Comment