गेवराई;-( प्रतिनिधी )गेवराई शिवसंग्रामचे युवक तालुकाध्यक्ष दत्ता जाधव हे मागिल काही महिन्यापासून पक्षाच्या विरोधी कारवाया करत आहे,तसेच गेवराई तालुक्यातील शासकीय कार्यालयातील आधिकारी व कर्मचारी यांना ब्लकमेल करुन त्यांना पैशाची मागणी शिवसंग्रामच्या नावाखाली करत आसल्याचे दिसून येत आहे.हे प्रकार ते हमखास पक्षाच्या नावाखाली करत आसल्याने पक्षाची विनाकारण दत्ता जाधव यांच्यामुळे गेवराई तालुक्यात बदनामी होऊ लागली आहे.हे सर्व प्रकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.विनायकराव मेटे यांच्या निदर्शनास आणून दिले असुन पक्षाच्या आदेशा प्रमाणे दि.२० जुन पासून गेवराई तालुका युवक शिवसंग्रामचे अध्यक्ष दत्ता जाधव यांच्यी शिवसंग्राम पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आसल्याची माहिती गेवराई शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष कैलास माने यांनी अधिकृत पञाद्वारे दिली आहे.
गेवराई तालुका शिवसंग्रामचे युवक तालुकाध्यक्ष दत्ता जाधव हे मागिल काही महिन्यापासून गेवराई तालुक्यात पक्ष विरोधी कारवाया करत आसल्याचे अनेक वेळी विविध ठिकाणी दिसून आले आहे.तसेच तहसील,पंचायत समिती,गटशिक्षणाधिकारी,बांधकाम,तलाठी,ग्रामसेवक,महसूल,रजिस्ट्री ऑफिस आदि शासकीय कार्यालयातील आधिकारी व कर्मचारी यांना शिवसंग्राम पक्षाच्या नावाखाली ब्लॅकमेल करुन या लोकांकडून पैशाची मोठ्या प्रमाणात मागणी करु लागले आहेत. विविध भ्रष्टाचार प्रकरणी दत्ता जाधव यांनी मोठ्या प्रमाणावर अशा लोकांकडून पैसे उकळले आसल्याचे शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष कैलास माने यांनी सांगितले.दत्ता जाधव यांच्यामुळे गेवराई तालुक्यात शिवसंग्राम पक्षाची बदनामी होऊ लागली आहे.
दत्ता जाधव यांचे गेवराई तालुक्यातील विविध बदनामीच्या कामांची माहिती पुराव्यानिशी तालुका अध्यक्ष कैलास माने यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.विनायकराव मेटे यांच्या कानावर घातली आहे.त्यामुळे २० जूनपासून अधिकृत शिवसंग्राममधून दत्ता जाधव यांच्यी हकालपट्टी करण्यात आली आसल्याचे पञाद्वारे शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष कैलास माने यांनी सांगितले आहे.दरम्यान दत्ता जाधव यांच्यी शिवसंग्राम मधून हकालपट्टी करण्यात आल्याने त्यांचा शिवसंग्राम पक्षाची आता काहीही संबंध नसल्याचे देखील कैलास माने यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment