Friday, March 6, 2020

ह.भ.प.पुंडलीक महाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदाय व गुरुपरंपरेतील व्यक्तिमत्व गमावले;-ना. धनंजय मुंडे

मुंबई/ बीड दि.०६ (प्रतिनीधी )  चिंचोली ता. पाटोदा येथील श्री. क्षेत्र गहिनी नाथगड संस्थानचे महंत ह. भ. प. पुंडलीक महाराज यांच्या निधनाने बीड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील व गुरु परंपरेतील अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्व गमावले आहे असे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आज. श्री. मुंडे यांनी पुंडलीक महाराजांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.
वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ यांचे शिष्य ह. भ. प. पुंडलीक महाराज यांनी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जिल्ह्यात संत परंपरेतील विचारांची रुजवन केली होती. आज (दि. ०६) रोजी त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. पुंडलीक महाराजांना आज अमलकी एकादशी दिवशी देवाज्ञा व्हावी हा विलक्षण योगायोग असल्याचे म्हणत धनंजय मुंडे यांनी ह. भ. प. पुंडलीक महाराजांना श्रद्धांजली वाहिली आहे.

No comments:

Post a Comment