पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला २१ वर्षे वयाची असून वाशीम जिल्ह्यातील आहे. ही महिला पतीसोबत पुण्यात आली होती. पुण्यात दोघे राहण्यासाठी खोली शोधत होते. रात्र झाल्यामुळे आरोपी भोंग याने या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्ये झोपण्यास सांगितले. दोघेही नवीन असल्याने त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळाने महिलेचे पती वॉशरूमला गेले.
दरम्यान पती वॉशरूमला गेल्याचे पाहून आरोपी भोंग याची नियत फिरली. त्याने अचानक गाडी सुरू केली आणि महिलेचे अपहरण केले. त्यानंतर स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात फुटपाथवर या महिलेला नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तर पुन्हा बस कात्रज परिसरात नेली आणि तेथील फुटपाथवर दुसऱ्यांदा बलात्कार केला. दरम्यान महिलेचा पती तिला शोधत होता. पण, बस व पत्नी न सापडल्याने त्याने पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे
No comments:
Post a Comment