Tuesday, June 21, 2022

सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या सेवेसाठी यापुढेही कार्यरत राहणार-माजी नगरसेवक विठ्ठल दंदे


*विठ्ठल दंदे यांचा माणिकनगर मित्र मंडळाच्या वाढदिवसानिमित्त सत्कार*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहर आणि परिसरातील  माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानेच आपल्यावर मनापासून प्रेम केले असून या प्रेमाची शिदोरी घेत आपण कार्यरत आहोत. यापुढेही सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्यरत राहुत असा विश्वास माजी नगरसेवक विठ्ठल तात्या दंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान माणिकनगर मित्र मंडळाच्या वतीने आज श्री.दंदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.
माजी नगरसेवक विठ्ठल तात्या दंदे यांचा वाढदिवस आज परळी शहर व परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आज दिवसभर विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त विठ्ठल दंदे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना माजी नगरसेवक विठ्ठल तात्या दंदे यांनी सांगितले की, परळी शहर आणि परिसरातील नागरिकांचे आपल्यावर मनापासून प्रेम असून मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांसाठी जे शक्य आहे ते काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आपले आशिर्वाद आणि सहकार्य माझ्या पुढील आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे असून यापुढेही आपल्या सेवेत अधिक जोमाने कार्यरत राहुत असा विश्वास श्री दंदे यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment