Thursday, June 23, 2022

मा जिल्हाशल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री रुग्णालय लोखंडी येथे प्रथमच सिजिरियन प्रसूती.


===========

केज "प्रतिनीधी" -  आज दि 22 जून 2022 रोजी मा जिल्हाशल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिक्षिका सर्जन डॉ अरुणा केंद्रे मॅडम यांच्या नियोजनाखाली स्त्री रोग तज्ञ डॉ सुनील जाधव व डॉ आवाड, भुलतज्ञ डॉ दिगंबर मुंडे,बालरोगतज्ज्ञ डॉ सिद्धेश्वर मुंडे, डॉ प्रसाद कुलकर्णी, डॉ कौस्तुभ कुलकर्णी, यांनी प्रथमच सुजाता सागर आपळे या महिला पेशंट ची रुग्णालयात सिझेरीन द्वारे प्रसूती केली

तसेच या हॉस्पिटल मध्ये गगुंतागुंतीच्या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. तसेच O negative रक्त गट असणाऱ्या महिला रुग्णाची गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी पणे करण्यात आली .
कोविड काळात सदरील रुग्णालयाने कोविड रुग्णांची सेवा करून नावलौकिक मिळविला होता . कोविड पश्चात नव्याने सुरू झालेल्या स्त्री रुग्णालयात प्रथम सिझेरीन डिलिव्हरी आज करण्यात आली . या रुग्णालयात सुसज प्रसूती कक्ष , पॅथॉलॉजि लॅब, क्ष किरण विभाग, ई. सि. जि. , तसेच बालकांच्या तपासणीसाठी बालरोगतज्ञा मार्फत उपचार व इतर सुविधा उपलब्ध आहेत त्याचा परिसरातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. अरुणा केंद्रे यांनी केले आहे. या रुग्णालयात खालील सर्व डॉक्टर व कर्मचारी रुग्णाना चांगली सेवा देत आहेत.
अस्थीरोगतज्ञ डॉ ओंकार ताथोडे, भीषक डॉ धर्मपाल शिंदे, परिसेविका श्रीमती भट्टे, शिंदे, मुरमुडे, अधिपरिचरिका श्रीमती कुलकर्णी, सिरसाट,दीक्षित, गाडेकर, नवनाथ पवार, इम्रान ,घुले, स्वामी कक्षसेवक मुख्तार, खोमणे, निंगुळे, बनसोडे. हे परिश्रम घेतं आहेत.

No comments:

Post a Comment