____
शेतक-यांना शेतावर जाण्यासाठी रस्ता असावा व मजुरांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना केवळ नावालाच असुन पावसाळ्यापुर्वी रस्त्याचे कामे पुर्ण होणे अपेक्षित असताना पावसाळा तोंडावर आला तरी सुद्धा शासकीय नियमांच्या कचाट्यात योजना सापडली असुन प्रसिद्धी माध्यमाद्वारे जरी गाजावाजा करण्यात येत असला तरी वास्तव वेगळेच असुन अजुन पाणंद रस्त्याची कामे कागदावरच असून तांत्रिक बाबीमुळे सुरू करण्यात आली नसल्याचे गटविकास आधिकारी पंचायत समिती मधुन सांगत लवकरच सुरू करण्यात येईल म्हणत बोळवण केली जात आहे.
लिंबागणेश येथील जाधव/ढवळे वस्तीवर ग्रामस्थांनी स्वखर्चाने रस्ता करण्यास सुरूवात:-डाॅ.गणेश ढवळे
_____
बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल जाधव वस्ति,ढवळे वस्ति,घाडगे वस्ति,वाणीवस्ति यांनी पाणंद रस्त्यासाठी ग्रामपंचायत ठराव,गटविकास आधिकारी पंचायत समिती यांना लेखी निवेदन आदि कागदपत्रे दिली असून तांत्रिक कारणामुळे रस्त्यास विलंब होत असल्याचे पाहून शेवटी गुडघाभर चिखलातून जाण्याची वेळ येऊ नये म्हणून पावसाळ्यापुर्वी वर्गणी गोळा करून स्वखर्चाने रस्ते कामास सुरुवात केली आहे. शालेय विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यायेण्यासाठी,महिलांना आठवडी बाजार तसेच भाजीपाला आदिंची अडचण येत असल्यामुळे वर्गणी गोळा करून रस्ताकाम ४-५ दिवसापासुन सुरू केले असून आपल्या रस्त्याची समस्या स्वतःच सोडवण्याचा प्रयत्नात आहेत.
No comments:
Post a Comment