कोरोना व्हायरस महामारीनंतर आता जवळपास 2 वर्षांहुन अधिक काळ उलटला आहे. या 2 वर्षांनंतर आता कुठे सर्वसामान्यांचे आयुष्य पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे. या महामारीच्या काळात नोकरदारवर्ग, सर्वसामान्यांना मोठा फटका बसला. तर दुसरीकडे अनेकांना आपल्या नोकऱ्या देखील गमवाव्या लागल्या आहे. या काळात केंद्र सरकारकडून गरीब व मध्यम वर्गाला मोफत अन्न-धान्य दिले जात आहे. याचा फायदा आता तुम्ही देखील सप्टेंबर 2022 पर्यंत घेऊ शकता.
मात्र, अनेकांकडे रेशन कार्ड असून देखील या योजनेचा फायदा घेता येत नाहीये. याचे कारण म्हणजे अद्याप त्यांनी आधार नंबरला रेशन कार्डशी लिंक केलेले नाही. तुम्ही देखील रेशन कार्ड (Ration Card) आधारला (Aadhaar) लिंक केले नसल्यास त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करा. आणि पुढील 2 महिने मिळवा मोफत अन्नधान्य…
कसे करणार रेशन कार्ड- आधार कार्डशी लिंक
Aadhaar-Ration Card लिंक करण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा.
येथे ‘Start Now’ वर क्लिक करा.
येथे तुम्हाला तुमच्या राज्याची व जिल्ह्याची माहिती द्यायची आहे.
पुढे ‘Ration Card Benefit’ च्या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर, रेशन कार्ड नंबर, ई-मेल आणि मोबाइल नंबर इत्यादीची माहिती द्या.
आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
ओटीपी भरल्यानंतर स्क्रीनवर प्रोसेस पूर्ण झाल्याचा मेसेज येईल.
ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे आधार व्हेरिफाय होईल व रेशन कार्डशी लिंक झालेले असेल.
दरम्यान, आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक झाल्यानंतर तुम्ही या सरकारच्या योजनांचा लाभ घेता येईल.
No comments:
Post a Comment