Wednesday, June 22, 2022

आज पुन्हा एक रोड रोमियो ठोकला ! : कुटुंबीयावर आली नामुष्कीची वेळ !


केज (प्रतिनीधी) :- शिकवणीला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेडछाडीचा प्रयत्न करणाऱ्या एका बदमाशाला चांगलाच चोपला. पुन्हा तो रोडवर उभा राहून आगळीक करण्याची हिम्मत करणार नाही.

केज येथे शिकवणीला जाणाऱ्या एका मुलीला मागील काही दिवसांपासून एक रोडरोमिओ त्रास देण्याचा प्रयत्न करीत होता. ही माहिती त्या मुलीने निर्भीडपणे पालकासोबत येऊन गोपनीय रित्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना दिली आणि तसेच त्याच्या दुचाकीचा नंबर पोलीसांना कळविताच क्षणाचाही विलंब न करता सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस नाईक अशोक नामदास आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने त्या बदमाशाचा पाठलाग करून पकडले. त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याची ‘सरबराई’ केली. त्यामुळे आता तो रस्त्यात उभे राहण्याची देखील हिम्मत करू शकणार नाही. पोलीसांनी त्याच्या नातेवाईकाला बोलावून घेऊन त्यांची कानउघाडणी केली.

” मुली आणि महिलांनी तसेच शाळेच्या आजू बाजूच्या व्यापारी बंधू,सुजान नागरिक,पत्रकार बंधू यांनी अशा प्रकारे जर कोणी आगळीक करण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्याचे नाव, फोटो, फोन नंबर किंवा वाहनाचा नंबर पो.स्टे केज मला स्वतः ला अथवा पोलीस अधिकाऱ्यांना अथवा स्टाफला कळवावेत. आम्ही त्यांच्या विरुद्ध मा.पोलीस अधीक्षक सर, मा. अपर पो.अधीक्षक,अंबाजोगाई आणि स पो अ पंकज कुमावत सर यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर कारवाई करू आणि माहिती देणारांचे नाव गुप्त ठेवले जाईल. “
—– शंकर वाघमोडे,
(स.पो.नि. केज पो. स्टे.)


No comments:

Post a Comment