Wednesday, June 22, 2022

राज्यपाल कोश्यारी यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही कोरोनाची लागण.

मुंबई  (प्रतिनीधी) :- राज्यपाल कोश्यारी यांना कोरोना ची लागन झाली होती. त्यातच आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे.

आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याच्या संदर्भात मुंबईत काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. यानंतर काँग्रेस नेते कमलनाथ आणि नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमचा एकही आमदार फुटला नसल्याचं यावेळी कमलनाथ यांनी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे कोविड पॉझिटिव्ह असून फोनवरुन त्यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली.

No comments:

Post a Comment