परळी वैजनाथ (प्रतिनिधी) हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या मार्गाने व शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व युवासेना प्रमुख ना.आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सामाजिक हित साठी कार्य करणारी संघटना आहे असे मनोगत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार ठक्कर यांनी शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त शक्ती कुंज वसाहत येथे वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले.
परळी प्रभू वैद्यनाथांच्या भूमित शिवसेना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या आरंभी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्या नंतर वड, पिंपळ, लिंब, उंबर चिंच, आवळा, बेल, करंज, सप्तपरणी अशा विविध प्रकारच्या 560 वृक्षाचे वृक्ष लागवडी साठी वृक्ष आमच्या संगोपन तुमचे या उपक्रमाची सुरुवात शक्ती कुंज वसाहत येथे शिवसेना उप जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार ठक्कर, युवासेना बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे, शिवसेना मदत कक्ष तालुका प्रमुख सतीश जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली .या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उप शहरप्रमुख किशन बुंदेले यांनी केले.
या वेळी युवासेना परळी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, शिवसेना शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, विद्यार्थी सेना मा.तालुका तालुका प्रमुख अमित कचरे, विभाग प्रमुख बबन ढेंबरे, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मनीष जोशी, नवनाथ वरवटकर, महेश काळे, श्रीमती कांताताई कांबळे मॅडम, राजेश शिंदे,योगेश घेवारे,दिलीप शिंदे, संतोष आव्हाड, खंडू निकम,प्रकाश देवकर, नागनाथ तूपसमंदर, शिवम मोहिते, संस्कार पालीमकर आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment